पीक पाहणी अ‍ॅपमधील अडचणीमुळे विनाअट अनुदान द्यावे - परजणे

परजणे
परजणे

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

अ‍ॅपवर पिकांच्या नोंदी करताना शेतकर्‍यांना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नोंदीची मुदत 15 ऑक्टोबरपर्यंतच असल्याने पिकांच्या नोंदी करणे अशक्य आहे. या अडचणी विचारात घेऊन पिकांच्या नोंदीसाठी मुदत वाढवून द्यावी किंवा विनाअट व सरसकट नोंदी करून शेतकर्‍यांना अनुदान मिळवून द्यावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठविलेल्या पत्रात श्री. परजणे यांनी खरीप पिकांची सध्याची परिस्थिती निदर्शनास आणून दिली. शासनाने खरीप पिकांची नोंद करण्यासाठी ई-पीक पाहणी या अ‍ॅपचा पर्याय शेतकर्‍यांना दिलेला आहे. तोही सक्तीचा केलेला असून त्यासाठी 15 ऑक्टोंबर ही शेवटची मुदत दिलेली आहे.

या अ‍ॅपचे सर्व्हर नेहमीच स्लो होत असल्याने तसेच ते वारंवार बंद पडत असल्याने आजही कित्येक शेतकर्‍यांना पिकांच्या नोंदी अजूनही करता आलेल्या नाहीत. शासनाने खरीप पिकांच्या नोंदी करण्यास किमान पंधरा ते वीस दिवस तरी मुदतवाढ देणे गरजेचे आहे किंवा मुदतवाढ देता आली नाही तर खरिपाच्या नुकसानीचा विचार करून शेतकर्‍यांना विनाअट व सरसकट अनुदान मिळवून द्यावे, अशीही मागणी परजणे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com