गुहाचा विरोबा पाझर तलाव फुटला

गुहाचा विरोबा पाझर तलाव फुटला

गुहा |वार्ताहर| Guha

परतीच्या पावसाने गुहा, गणेगाव, कनगर, वडनेर, परिसरात पावसाने चांगलेच थैमान घातले असून गेले पाच दिवसांपासून रात्रंदिवस पावसामुळे हाहाकार उडाला आहे. बुधवारी रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास विजेच्या आवाजाने पावसास सुरुवात झाली.

त्यामुळे वडनेरच्या तळ्यापासून तर कणगर, गणेगाव, या पाझर तलावास अतिवृष्टीमुळे तळे ओव्हरफ्लो होऊन ते गुहाचे माजी सरपंच भगवान कोळसे यांच्या शेतातील तीन तळे ओव्हरफ्लो होऊन विरोबा तळ्यात मोठ्या प्रमणावर पाणी आल्यामुळे तो फुटला आणि ते पाणी मळ्यात, कानिफनाथ मंदिरात, कोळसे यांच्या घरात तसेच आजुबाजुला ओसंडून वाहत छोटासा महापूर दिसू लागला.

त्यामुळे गुहा गावातील शेतकरी आणि येणारी-जाणारी वाहने पुलावर उभी राहून पाण्याचा प्रवाह पहात होते. 10 ते 20 वर्षांपासूनचे हे तळे असल्यामुळे आजुबाजुच्या शेतकर्‍यांना या तळ्याच्या पाण्याचा उपयोग होत होता. परंतु सहा ते आठ महिने टिकणारे पाणी एकदम भुईसपाट झाले. त्यामुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com