गावातील विजेचे खांब व रोहित्रांचा ७९ लाखांचा कर भरणा करा

फत्तेपूर ग्रामपंचायतीने महावितरणला दिली तिसरी नोटीस
गावातील विजेचे खांब व रोहित्रांचा ७९ लाखांचा कर भरणा करा

चांदा (वार्ताहर)

नेवासा तालुक्यातील फत्तेपुर ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत हद्दीत वापरत असलेले रोहित्र, इलेक्ट्रीक पोल, टॉवर हायटेन्शन पोल यांच्या करापोटी विज वितरणला तिसरी नोटीस दिली असून एक महिन्याच्या आत अठ्याहत्तर लाख नव्वद हजार रुपये थकबाकी न भरल्यस जप्तीची कारवाई करणार असल्याचे नोटिशीत नमूद केले आहे, अशी माहिती सरपंच तुळशीदास शिंदे यांनी दिली.

गावातील विजेचे खांब व रोहित्रांचा ७९ लाखांचा कर भरणा करा
गट, गणांच्या 'फोडतोडी'च्या भितीनेच धास्तावले सदस्य

कार्यकारी अभियंता घोडेगाव यांना या संदर्भात दिलेल्या पत्रात म्हटले की आपणास वेळोवेळी ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार करूनही आपल्या महावितरणने थकीत कर भरलेला नाही. आपल्या महावितरण कंपनीने फत्तेपूर ग्रामपंचायत गावठाण व शेतजमीन हद्दीमध्ये जवळपास १४५ इलेक्ट्रिक पोल, ११ रोहित्र, ३०० हाय टेन्शन पोल, १४ टॉवर पोल असे गेली २० वर्षे उभी करून आपण व्यवसाय करीत आहात. आजपर्यंत त्याचा कोणताही कर ग्रामपंचायतीस दिलेला नाही. तसेच सदरील सर्व यंत्रणा उभी करण्याकरिता आपण ग्रामपंचायतीच्या जागेचा वापर केलेला आहे.

गावातील विजेचे खांब व रोहित्रांचा ७९ लाखांचा कर भरणा करा
तरूणाची आत्महत्या; गंगामाई कारखान्यांच्या तिघांविरूद्ध गुन्हा

या बाबत ग्रामपंचायत फत्तेपूर कडील ग्राम सभा दि. १९/०८/२०२१ रोजीचा ठराव क्र ५ ने महावितरणकडून २० वर्षाचे थकबाकी व्याजासहित वसूल करणे बाबत ठराव मंजूर करण्यात आला होता. तसे आपणास दि २३ ऑगस्टर रोजी प्रथम मागणी नोटीस व ११ ऑक्टोबर रोजी द्वितीय नोटीस याद्वारे कळविण्यात आले होते परंतु आपण आतापर्यंत ग्रामपंचायतीचा थकीत कर भरलेला नसून कुठलेही तोंडी अगर लेखी उत्तर दिलेले नाही. तरी आपणाकडील अठ्याहत्तर लाख नव्वद हजार रुपये थकबाकी व्याज व्यतीरीक्त एक महिन्याच्या आत न भरल्यास ग्रामपंचायत अधिनियम १९५८मधील कलम १२९नुसार ग्रामपंचायत पुढील कारवाई करेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com