पवननगर परिसरात एकाच दिवशी तीन दुकाने फोडली
सार्वमत

पवननगर परिसरात एकाच दिवशी तीन दुकाने फोडली

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

भिस्तबाग परिसरातील पवननगर येथे अज्ञात चोरट्यांनी बुधवारी पहाटे तीन दुकाने फोडली. या चोरीमध्ये रोख रक्कम व इतर साहित्य चोरून नेले. एकाचवेळी तीन दुकाने फोडल्याने परिसरातील व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली नव्हती.

बुधवारी पहाटे पवननगर येथील रेणुका टॉईज गिफ्ट अ‍ॅण्ड एम्पोरियम या दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील दोन हजार 500 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. तसेच, याच परिसरात असलेल्या जगदंबा मेडिकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्सचे शटर उचकाटून गल्ल्यातील सुमारे चार हजार रुपये नेले.

चोरट्यांनी परिसरातील ओमकार एण्टरप्राईजेस लेडिज वेअर या दुकानातही चोरीचा प्रयत्न केला. तेथे काही न मिळाल्याने दुकानातील कपड्याची उचकापाचक केली. दुकानातील काही कपडे चोरून नेले.

घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण सुरसे पथकासह घटनास्थळी गेले.

Deshdoot
www.deshdoot.com