पतसंस्थांच्या प्रलंबित प्रश्नांसदर्भात सहकारमंत्र्यांनी आदेश काढले - कोयटे

पतसंस्थांच्या प्रलंबित प्रश्नांसदर्भात सहकारमंत्र्यांनी आदेश काढले - कोयटे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

महाराष्ट्रातील नागरी सहकारी पतसंस्थांच्या विविध प्रश्नांबाबत प्रभारी सहकार मंत्री जयंत पाटील यांचे अध्यक्षतेखाली 28 ऑगस्ट रोजी मंत्रालयात

पार पडलेल्या बैठकीच्या अनुषंगाने काही विषयांचे आदेश सहकारमंत्री जयंत पाटील व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी काढल्याचे माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी दिली.

पतसंस्थांच्या थकबाकी वसुलीसाठी कायदा कलम 101 चे दाखले ऑनलाईन मिळणेसाठी तसेच 101 चा वसुली दाखला जास्तीत जास्त 60 दिवसांत मिळणेबाबत या बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे सहकार आयुक्त यांनी कार्यवाही करावी असे सुचविण्यात आलेले आहे.

पतसंस्थाच्या थकबाकीदारांची मालमत्ता लिलाव करण्यापूर्वी अपसेट प्राईस सहकार खात्याकडून घ्यावी लागते. याबाबत देखील दोन महिन्यांत अपसेट प्राईस न मिळाल्यास ऋणको संस्थेने दाखल केलेली अपसेट प्राईस मान्य झाल्याचे अपोआप समजण्यात येईल.

तसेच धनको संस्थेचे व ऋणको संस्थेचे एकमत न झाल्यास ऋणकोस ती मालमत्ता विकण्यासाठी 30 दिवसांची मुदत देऊन त्यानंतर धनको संस्थेस ही मालमत्ता विकण्यास परवानगी मिळण्याबाबत देखील या पत्रकामध्ये सूचित केले आहे.

राज्य फेडरेशनच्या वतीने कर्जदारांची गुणवत्ता तपासण्यासाठी तयार केलेली क्रॉस प्रणाली सक्तीची करणेबाबत तातडीने कार्यवाही करणेबाबत देखील सुचविले आहे. तसेच नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील पतसंस्थांच्या अडकून पडलेल्या ठेवी या पतसंस्थेतील लहान लहान ठेवीदार घटकांच्या असल्याने नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या ठेवी प्राधान्याने परत द्याव्यात, असे या पत्रात नमूद केले असल्याचे काका कोयटे यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com