पतसंस्थांच्या दैनंदिन कामकाजात बदल

- करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचा निर्णय - जिल्ह्यातील पतसंस्था सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू - शनिवार व रविवार जनता कर्फ्यूमुळे पतसंस्था बंद राहणार
पतसंस्थांच्या दैनंदिन कामकाजात बदल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात वाढत असलेल्या करोनाचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व कडक नियमावलीमुळे

व पतसंस्थांच्या कर्मचार्‍यांचे करोनापासून संरक्षण व्हावे, यासाठी जिल्ह्यातील पतसंस्थांच्या दैनंदिन कामकाजात बदल करण्यात आला आहे.

पतसंस्थांची अर्थसेवा ही अत्यावश्यक सेवेत येत असल्यामुळे नियमांचे पालन करत पतसंस्था चालू ठेवण्यात येत आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील पतसंस्थांच्या कामकाजात बदल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पतसंस्थांनी बदललेल्या वेळे नुसारच कार्यालयाचे काम करावे.

कामकाजाच्या वेळेतील बदल 31 मे पर्यंत लागू असेल. त्यानंतर त्यावेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घेऊन कळविण्यात येईल. सर्व संस्थांच्या कामकाजात सुसूत्रता असावी यासाठी जिल्हयातील सर्व सहकारी पतसंस्थांनी या नियमांचे तंतोतंत पालन कारण अर्थसेवा द्यावी, असे आवाहन जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सबाजीराव गायकवाड व सहकार भारतीचे अध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र बोरावके यांनी केले आहे.

पतसंस्थांच्या कामकाजाचे नवे नियम पुढीलप्रमाणे, जिल्ह्यातील पतसंस्था सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ग्राहक सेवा देतील, शनिवार व रविवार जनता कर्फ्यूमुळे पतसंस्था पूर्णपणे बंद राहतील,पतसंस्थांच्या कर्मचार्‍यांना ओळखपत्र देण्यात यावे, कर्मचार्‍यांच्या गरजेनुसार संख्येचे नियमन करावे, सर्व पतसंस्था कर्मचार्‍यांनी करोना प्रतिबंधक लस घ्यावी, शक्य असेल त्या सेवा जास्तीत जास्त डिजीटल माध्यमांचा वापर करुनच कराव्यात, संस्थेत व प्रवेशद्वारात सॅनिटायझरची सोय करावी, सोशल डिस्टन्सींगचे नियमांचे पालन करावे, विविध संस्था चालक व सहकारी अधिकारी यांच्या बरोबर चर्चा करुन खातेदार, ठेवीदार व ग्राहकांच्या सोयींचा विचार करुन वेळा ठरविण्यात येत आहे. पतसंस्थांच्या दैनदिन कामकाजात केलेल्या बदलाची माहिती जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्यावतीने जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा पोलीस अधिक्षक व सर्व तालुका सहाय्यक निबंधक यांना देण्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com