‘त्या’ पत्रा मार्केटवर कारवाई होणार ?

महापालिकेकडून सर्वेक्षण सुरू
‘त्या’ पत्रा मार्केटवर कारवाई होणार ?

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पाईपलाइन रस्त्यावरील (Pipeline Road) पत्रा मार्केटवर (Patra Market) केलेल्या कारवाईनंतर आता शहरात जेथे असे पत्रा मार्केट (Patra Market) उभारण्यात आले आहे त्यावर हातोडा उगारण्याचा निर्णय महापालिकेने (Municipal Corporation) घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अतिक्रमण विरोधी पथकाकडून (Anti-Encroachment Squad) याची माहिती घेतली जात असून, लवकर या कारवाईची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे समजते.

उपनगरातील महत्त्वाचा मानला जाणार्‍या पाईपलाइन रस्त्याच्या कडेला पत्रा मार्केट उभारण्यात आले होते. ही दुकाने उभारताना महापालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच शेड आणि त्यापुढे दुकानात येणार्‍यांची वाहने यामुळे वाहतुकीलाही मोठा अडथळा ठरत होता. जवळपास 25 दुकाने असलेले हे मार्केट मंगळवारी महापालिकेने काढून टाकले. केवळ पाइपलाइन रस्त्यावरच नव्हे, तर ठिकठिकाणी शहरात अशी पत्रा मार्केट उभारण्यात आले आहेत. दोन वर्षापूर्वी झालेल्या सर्वेक्षणात अशी सुमारे दिडशे दुकाने बेकायदेशीरपणे उभारण्यात आल्याचे आढळून आले होते. दोन वर्षात यात मोठी वाढ झाली आहे. महापालिका अशा दुकानांची माहिती एकत्रित करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com