VIDEO : पाथरे खुर्दच्या सबस्टेशनसमोर शेतकर्‍यांचे आंदोलन

ऐन उन्हाळ्यात दिवसाआड वीजपुरवठा : पिकांची वाताहात
VIDEO : पाथरे खुर्दच्या सबस्टेशनसमोर शेतकर्‍यांचे आंदोलन

आरडगाव (वार्ताहर)

ऐन उन्हाळ्यात दिवसाआड वीजपुरवठा होत असल्याने खरीप हंगामातील नव्यानेच लागवड केलेल्या पिकांची वाताहात होत आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांनी राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथील महावितरणच्या सबस्टेशनसमोर आंदोलन केले.

संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी तात्काळ सलग वीजपुरवठ्याची मागणी केली. त्यावर दोन वर्षापूर्वी मंजूर असलेले वांजुळपोई येथील मंजूर सबस्टेशन झाले तर सुरळीत वीजपुरवठा होईल, असे सांगून तोपर्यंत रोहित्रावरील अतिरिक्त भारामुळे सलग वीजपुरवठा होणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे शेतकर्‍यांनी पुन्हा आठ दिवसात आंदोलन करण्याचा इशारा दिला असून अन्यथा पाथरे खुर्द सबस्टेशनला टाळेबंदी करून तेथील कामकाज बंद पाडण्याचा इशारा दिला आहे.

सध्या खरीप हंगाम सुरू झाला आहे. खरीप हंगामातील सोयाबीन आणि कपाशीची लागवड राहुरी तालुक्यातील पूर्वभागातील मांजरी, शेनवडगाव, वांजूळपोई, तिळापूर, कोपरे या गावातील शेतकर्‍यांनी केली आहे. मात्र, मान्सुन लांबणीवर पडला, त्यातच मे महिन्याच्या अखेरीस बरसणार्‍या रोहिणी नक्षत्रानेही अंगठा दाखविल्याने पिके जगविण्यासाठी शेतकर्‍यांना विहिरी आणि कुपनलिकांचा आधार घ्यावा लागला. मात्र, नेहमीप्रमाणे विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने संतापलेल्या शेतकर्‍यांनी पाथरे खुर्द सबस्टेशनवर मोर्चा काढला.

यावेळी बाळासाहेब चव्हाण, रवींद्र पवार, युवराज जगताप, सोपान घोडके, सयाजी जगताप, अभिषेक जगताप, बजरंग घोडके, निरंजन जगताप, शामराव पवार, तुळशीदास जगताप, धनंजय जगताप, बाळासाहेब कुदनर, संजय विटनोर, राजेंद्र विटनोर, प्रल्हाद जगताप, रामकृष्ण जगताप, अशोक जगताप, संजय पवार, विश्‍वास पवार, शेषराव पवार, जगन्नाथ जगताप, राजेंद्र जगताप, वामन पवार, भास्कर पवार, बापूसाहेब कारंडे, अशोक जाधव, सतीश जगताप, सुधीर सिंगाने, किशोर जगताप, सखाराम कुदनर, योगेश पवार आदी सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com