पाथर्डीत महिलेचा मृतदेह आढळला

पाथर्डीत महिलेचा मृतदेह आढळला

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील वन विभागाच्या डोंगरात एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह नेमका कोणाचा असावा याबाबत काही काळ परिसरात विविध तर्क वर्तविले जात होते. मात्र परिसरातील एक महिला सहा दिवसांपासुन बेपत्ता होती अखेर तो मृतदेह परिसरातील महिलेचाच असल्याची खात्री पटल्याने पोलिसांसह सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला. द्रौपदाबाई निवृत्ती धायताडक (रा. धायतडकवाडी ता. पाथर्डी) असे मृत वृद्धेचे नाव आहे.

सोमवारी सकाळी आकोला गावातील जगदंबावस्ती येथे एक गुडघ्यापासुन खाली तुटलेला मानवजातीचा पाय कुत्र्याने तोंडात धरून आणलेला आसताना लहान मुलांनी पाहिला. त्यांनी याची कल्पना घरच्यांना दिली. त्यानंतर नागरिक जमा झाले. पायात जोडवे असल्याने तो पाय महिलेचा असल्याची खात्री पटली.

ग्रामस्थांनी याची कल्पना पाथर्डी पोलिसांना दिली. पोलिस तत्काळ घटनास्थळी हजर झाले. नागरिकांनी परिसरातील डोंगररात शोध घेतला असता अकोला शिवारातील वन विभागाच्या हद्दीत हातपाय नसलेला मृतदेह आढळुन आला. मात्र तो मृतदेह कोणाचा याबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली असता सदर मृतदेह द्रौपदाबाई धायताडक या महिलेचा असल्याची खात्री झाली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com