पाथर्डीत व्हेज केकमध्ये आढळले अंड्याचे टरफल

पाथर्डीत व्हेज केकमध्ये आढळले अंड्याचे टरफल

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

शहरातील एका केक शॉप दुकानातून घेतलेल्या केकमध्ये अंड्याचे टरफल आढळल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे.

शहरातील नगर रोडवरील शंकर नगरमध्ये राहणार्‍या एका कुटुंबाने शहरातील एका केकच्या दुकानातून रविवारी व्हेज केक खरेदी करून घरी आणला. केक कापल्यानांतर त्यामध्ये अंड्याचे टरफल आढळल्याने त्या कुटुंबाला मोठा मनस्ताप झाला. व्हेज केकच्या नावाखाली अंड्याची टरफल केकमध्ये आढळत असतील तर ही गांभीर्याची बाब आहे. शहरात आणि तालुक्यात अनेक केकच्या दुकानी आहेत.

तेथील केकची गुणवत्ता व ठराविक मुदती नंतरही दुकानदार खाद्य पदार्थाची विक्री करत आहेत. याकडे अन्न भेसळ प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. केक बनवण्याचा कच्चा माल आणून अनेक केक शॉप दुकानदार स्वतः केक तयार करतात असाच हा केक तयार केला. त्यामध्ये अंड्याचे टरफल सापडले आहे.यामुळे संताप व्यक्त होत असून शहरातील या बेकर्‍यांना अधिकृत परवानगी आहे का? असेल तर त्यांच्यावर प्रशासनाने नजर ठेऊन नियमाचे उल्लंघन होणार नाही यासाठी काळजी घेणे गरजेचे झाले आहे.

Related Stories

No stories found.