पाथर्डीतील दोन गटांत धूमश्चक्री

परस्परविरोधी फिर्यादी : आठजण गंभीर जखमी
पाथर्डीतील दोन गटांत धूमश्चक्री

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

शहरातील अजंठा चौकात मंगळवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दोन गटात तलवारीने आपसातील तुंबळ हाणामारीत शिरसाठवाडी व भिकनवाडा या दोन गटांतील आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी परस्पर विरोधी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.

याप्रकरणी दाखल पहिल्या फिर्यादीत गणेश बाळासाहेब शिरसाठ हे स्वतः व सोबत असलेले महादेव बाळासाहेब शिरसाट, नितीन नवनाथ शिरसाट, नवनाथ यशवंत शिरसाठ (रा.शिरसाठवाडी) हे अजंठा चौकात दुध विक्री करत असताना भिकनवाडा येथील आरोपी मुन्ना निजाम पठाण याच्या गाडीचा धक्का लागून दूध सांडल्याचा जाब विचारला. याचा पठाण याला राग येऊन फारुख रफीक शेख, लाला रफीक शेख, निजाम रफीक शेख, जुबेर फारूख शेख, छोट्या राजू पठाण, जुबेर शफीक आतार, मुन्ना शेख, भैय्या शेख, काल्या निजाम शेख, रंगनाथ गायकवाड, सोहेल पठाण, बब्बू रिक्षावाला, सुरज दहीवाले, असिफ शेख व इतर 10 ते 12 आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या सहकार्‍यांना तलवार, चाकू, लोखंडी गज, लाठ्या काठ्याने जबर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीचे मोठे नुकसान केल्याचे फिर्यादी म्हटले आहे.

दुसर्‍या फिर्यादीत फिर्यादी अमीर निजाम शेख हा त्याचे मालकीच्या गाडीचा धक्का लागल्याच्या रागातून याचे डोक्यात लोखंडी गजाने आरोपी गोकुळ शिरसाठ, देवा शिरसाठ, प्रवीण शिरसाठ, गणेश शिरसाठ, नितीन शिरसाठ, संजय शिरसाठ यांच्यासह 10 ते 12 जणांनी फिर्यादी व त्यांचे सहकारी तौफिक शेख, रंगनाथ गायकवाड, जुबेर शेख यांना तलवार, लोखंडी गज, लाठ्या काठ्याने जबर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केले बाबत पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

यावेळी जमावाने केलेल्या दगडफेकीत वीस ते पंचवीस दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून दगडफेकीमुळे रस्त्यावर दगडांचा खच पडला होता तसेच अचानक झालेल्या धुमचक्रीने नागरिकांची पळपळ झाली. घटना ठिकाणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी भेटी दिल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com