पाथर्डी : खरवंडी कासार येथे चोरीचे सञ सुरुच

एकाच दुकानात तिसऱ्यांदा चोरी
पाथर्डी : खरवंडी कासार येथे चोरीचे सञ सुरुच

खरवंडी कासार | प्रतिनिधी | kharvandi Kasar

पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे चोरीचे सञ सुरुच आहे. खरवंडी कासार येथील व्यावसायिक अशोक खेडकर यांच्या मोबाईल शाॅपी व इलेक्ट्रॉनिक दुकानात राञी चोरी झाल्याचे सकाळी उघडकीस आले. या दुकानात ही तिसरी चोरी आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, खरवंडी कासार येथील व्यावसायिक अशोक खेडकर यांच्या मोबाईल शाॅपी व इलेक्ट्रॉनिक दुकानाचा वरील पञा तोडून दुकानातील विविध नामांकीत कंपन्याचे मोबाईल तसेच महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तु चोरटयांनी चोरून नेल्या आहेत. याबाबत एका पोलीस अधिकाऱ्याला चोरीची माहीती दुकान व्यवसायिक अशोक खेडकर यांनी कळवले असता, "चोरी झाली तर मग आम्ही काय तुमच्या दुकानात झोपायला येऊ का" असे दूरध्वनीवरून कळवले. सर्वसामान्य जनतेला जर अशी उत्तरे पोलीस प्रशाषनाच्या अधिकार्यांकडुन मिळत असतील तर चोरी, दरोडा, बलात्कार, विनयभंग अशा गुन्ह्यांचा तपास कसे लागणार असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे. खरवंडी कासार येथे चोर्यांचे सञ वाढत आहे. खरवंडी कासार येथुन तीन राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने जबरी चोरी रस्तालुटीच्या अनेक घटना घडत आहेत. चोर मोकाट असुन खरवंडी कासार येथील पोलीस दुरक्षेञ चौकी कायमस्वरूपी चालु ठेउन एक पोलीस उपनिरीक्षक व चार पोलीस काॅन्स्टेंबल ठेवण्याची मागणी खरवंडी कासार येथील नागरिक, व्यवसायिक करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com