पाथर्डी तालुक्यात विविध तीन ठिकाणी चोरीच्या घटना

सव्वा लाखाचा मुद्देमाल लंपास
पाथर्डी तालुक्यात विविध तीन ठिकाणी चोरीच्या घटना

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून दोन दिवसात विविध तीन ठिकाणी चोरट्यांनी हात साफ केला. यामध्ये एकुण सव्वा लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.

पहिल्या घटनेत अकोला येथील मनिषा संजय घुगे यांच्या घरातील खोलीचे कुलुप अज्ञात चोरटयांनी तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील सहा ग्रॅम वजनाच्या कानातील सोन्याच्या रिंगा, पाच ग्रॅम वजनाचे मिनी मंगळसुत्र, पाच ग्रॅम् वजनाची सोन्याची अंगठी व रोख रक्कम दहा हजार रुपये असा एकूण 58 हजारांचा एवंज चोरून नेला आहे.

दुसरी घटना येळी येथे घडली. येथील विजय राधाकिसन ढोले दुपारी घराला कुलूप लावून सर्व जण पाठीमागे शेतात कापूस खुरपत होते. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास विजय यांची पत्नी घरी आली तेव्हा घराचे लोखंडी गेटचे कुलूप तोडलेले दिसले. घरातील कपाटात असलेले दहा ग्रॅम वजानाचे सोन्याचे नेकलेस, अडीच तोळे वजनाचे गळ्यातील गंठन, साखळी, सहा ग्रम वजनाचे कानातील सोन्याचे फुले व रोख रक्कम अठराशे रुपये असा एकूण 62,300 रुपयांचा मुद्देमालावर चोरट्याने डल्ला मारला आहे.

तिसर्‍या घटनेत तालुक्यातील मिरी येथील बंद मोबाईल शॉपी दुकान फोडून सुमारे सात हजारांचे जुने मोबाईल चोरटयांनी लांबवले आहे. शुक्रवारी रात्री मोबाईल शॉपीचे कुलुप तोडून चोरी झाल्याची घटना घडली असून चोरी झाल्याची माहिती दुकान मालक जयदीप गवळी यांना शनिवारी पहाटे कळाली.या तिन्ही चोरीच्या घटनेबाबत पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला गेला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com