पाथर्डीचे तालुका आरोग्य अधिकारी सक्तीच्या रजेवर

डॉक्टर गळफास प्रकरणी पालकमंत्री मुश्रीफ यांची माहिती
पाथर्डीचे तालुका आरोग्य अधिकारी सक्तीच्या रजेवर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करंजी आरोग्य उपकेंद्रात (Karanji Health Sub Center) डॉ. गणेश शेळके (Dr. Ganesh Shelke) यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी (Suicide case investigation) सुरू आहे. या प्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे (Taluka Health Officer Dr. Bhagwan Darade) यांना सक्तीच्या रजेवर (compulsory leave) पाठविण्यात आले आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधितावर कारवाई करण्यात येईल अशी, माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ (Guardian Minister Hassan Mushrif) यांनी दिली.

पाथर्डी (PathardI) तालुक्यातील करंजी आरोग्य उपकेंद्रात असलेले समुदाय अधिकारी डॉ. गणेश गवर्धन शेळके (Dr. Ganesh Govardhan Shelke) यांनी कार्यालयातच गळफास घेऊन मंगळवारी आत्महत्या (Suicide) केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहिली असून त्यात आरोग्य अधिकारी (Health Officer), तहसीलदार(Tahsil) आणि कलेक्टर (Collector) यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी मिळाल्याने खळबळ उडाली.

या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश (Order to inquire) देण्यात आले असून तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. डॉ. शेळके यांच्या मृत्यूस कारणीभूत असणार्‍यावर चौकशी अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल, असे पालकमंत्री यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com