
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
एसटी बसला दुचाकीची धडक (ST Bus Bike Accident) बसून माजी सरपंचाचा मृत्यू (Former Sarpanch Death) झाला आहे. तर एक जण जखमी (Injured) झाल्याची घटना तालुक्यातील पाथर्डी-शेवगाव रस्त्यावरील डांगेवाडी शिवारात घडली आहे.
या अपघाताबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये (Pathardi Police Station) अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. या संदर्भातील अधिक माहिती अशी की, एसटी बसचे चालक सिकंदर कलंदर शेख (रा. पाथर्डी) हे सोमवारी बस क्रमांक एम एच 15 एस 8263 पैठण वरून पाथर्डीकडे (Pathardi) घेऊन येत असतांना डांगेवाडी फाटा (Dangewadi Phata) या ठिकाणी उजव्या बाजूने आलेल्या दुचाकीला या एसटी बसची धडक बसली.
या अपघातात (Accident) डांगेवाडी गावचे माजी सरपंच एकनाथ धोंडीबा डांगे (वय 70) यांचा मृत्यू झाला. तर आत्माराम तुळशीराम सकुंडे (वय 60 रा. डांगेवाडी) हे जखमी (Injured) झाले आहेत. जखमीं सकुंडे यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर डांगे यांना उपचारासाठी अहमदनगर येथे हॉस्पिटलला हलवण्यात आले होते. मात्र हॉस्पिटलला जाण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली. या अपघाताची कोणतीही नोंद पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) रात्री उशिरापर्यंत दाखल नव्हती.