
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
शहरातील वसंतदादा पाटील विद्यालयात मंगळवारी (दि.1) चोरी झाल्याची घटना घडली. यामध्ये स्टोअररूम मधून चोरट्याने शोळेचे आवश्यक लोखंड व बँचची चोरी केली. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे.
विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रकांत खाडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा पाथर्डी पोलिसात दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वसंत दादा पाटील विद्यालयाचे शिपाई यांनी विद्यालयाच्या रुम उघडल्या असता त्यांचे लक्षात आले की, विद्यालयाचे पाठीमागील स्टोअर रुमची खिडकी तोडुन अज्ञात चोरट्याने रुममध्ये ठेवलेले विद्यालयाचे कामकाजाचे लोखंडी गज, बँचेस अँगल, प्रयोगशाळेचे खराब साहीत्याची चोरी केल्याचे लक्षात आले.