पाथर्डीत रस्त्यासाठी काँग्रेसचा ठिय्या

गांधीचौक-चिंचपूर रोड दुरूस्त न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
पाथर्डीत रस्त्यासाठी काँग्रेसचा ठिय्या

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

शहरातील मध्यभागी असलेल्या इंदिरा गांधी चौक ते चिंचपूर रोड रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा अन्यथा कुठलीही पुर्वसुचना न देता अचानक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पाथर्डी तालुका काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.

याबाबत काँग्रेसचे पाथर्डी तालुकाध्यक्ष नासिर शहानवाज शेख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकारी व नागरिकांनी नगरपालिका कार्यालयासमोर या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ठिय्या आंदोलन करून मुख्याधिकारी संतोष लांडगे यांना निवेदन दिले. यावेळी बोलतांना नासिर शेख म्हणाले की शहरातील मध्यवर्ती भागातील असलेल्या इंदिरा गांधी चौक ते चिंचपूर रोड या रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर ठिक ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक उध्वस्त झाले असून रस्त्याखालुन गटारीचे पाणी पाझरत असून पायी चालणार्‍या नागरिकांच्या अंगावर गटारीचे पाणी उडत असते या रस्त्यावर पसरलेल्या दुर्गंधीमुळे नागरिकांना गैरसोयीचा प्रचंड सामना करावा लागत आहे.

यामुळे आरोग्याची व्यवस्था बिकट झाली असून डेंग्यूची साथ बळावत आहे.नगरपालिका प्रशासनाला वेळोवेळी तोंडी सांगुन व अनेकवेळा लेखी निवेदन देऊनही त्यावर उद्याप काहीच कार्यवाही केली नाही. नेहमीच उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. यावेळी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस प्राध्यापक जालिंदर काटे, सेवादल काँग्रेस तालुकाध्यक्ष किशोर डांगे, जिल्हा काँग्रेस प्रतिनिधी नवाबभाई शेख,तालुका काँग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष गणेश दिनकर,युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष गणेश जुनेद भाई पठाण, सामाजिक कार्यकर्ते परवेज पठाण, तालुका संघटक सचिन राजळे,अल्पसंख्याक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मुन्नाभाई खलिफा,काँग्रेस नेते अशोकराव ढाकणे, सामाजिक कार्यकर्ते बब्बूभाई बेकरी वाले,अर्षद पठाण, तालुका काँग्रेस तालुका काँग्रेस उपाध्यक्ष वसंतराव खेडकर,शहर युवक काँग्रेस उपाध्यक्ष महेश भैय्या दौंड,अल्पसंख्यांक काँग्रेसचे उपाध्यक्ष जब्बार भाई आतार,अल्पसंख्यांक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष युसुफ खान,तालुका काँग्रेस सरचिटणीस सुभाष कोलते,बबन खेडकर,आदींसह अनेक मान्यवर आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.