पाथर्डी शहरातील अतिक्रमणे काढण्याचे आदेश

जिल्हाधिकार्‍यांचे पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना पत्र
पाथर्डी शहरातील अतिक्रमणे काढण्याचे आदेश

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पालिका हद्दीतील शेवगाव रोड च्या जवळ असलेली अतिक्रमणे त्वरित काढून टाका असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांना दिले असून या आदेशा नंतर पालिका प्रशासनाने ही अतिक्रमणे काढून टाकण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरु केली आहे.

शेवगाव रोड लगत सध्या असलेल्या अनेक मोकळ्या जागेत काहींनी पत्र्याच्या टपर्‍या टाकून अतिक्रमणे केली असून ज्या जागेत ही अतिक्रमणे उभारण्यात आली ती जागा नेमकी पालिकेची की सार्वजनिक बांधकाम विभागाची या वादात ही अतिक्रमणे उभी राहिली असून या शिवाय ज्यांनी ही अतिक्रमणे केली आहेत ते कोणत्याही परिस्थितीत आपली अतिक्रमणे काढत नाहित. कारवाई करून ही अतिक्रमणे काढली की परत दुसर्‍या दिवशी अतिक्रमणे उभी राहत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

तर दुसरीकडे अनेकांनी मोठाल्या गुतूंवणूका करत या रोड लगत प्लॉट घेतले आहे तर काहींनी घरे सुद्धा बांधली आहेत मात्र अतिक्रमण झाल्याने या ठिकाणी मालमत्ता घेणार्‍यांना मोठी डोकेदुखी आहे. अतिक्रमणे करायची व ते काढण्यासाठी मोठाली रक्कम घ्यायची असा सुद्धा गोरखधंदा काहींनी सुरु केला असून या संदर्भात काहींनी थेट जिल्हाधिकारी ेभोसले यांच्या कडे तक्रारी केल्यानंतर भोसले यांनी लांडगे यांना ही अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले असून या संदर्भात लांडगे यांनी पोलिसांकडे अतिक्रमणे काढण्यासाठी पोलीस संरक्षण मागितले असून पुढील आठवड्यात ही कारवाई सुरु होणे अपेक्षित आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com