पाथर्डी पंचायत समितीत आपची गांधीगिरी

उशिरा येणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांना दिले गुलाबाचे फुल
पाथर्डी पंचायत समितीत आपची गांधीगिरी

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी पंचायत समितीच्या मुख्य प्रवेश्वदारावर गुरुवारी आम आदमी पक्षाच्या वतीने कार्यालयात उशीरा येणा-या अधिकारी व कर्मचा-यांना गुलाबपुष्प देवुन गांधीगिरी अंदोलन करण्यात आले.

आज सुमारे पंधरा ते वीस कर्मचारी आधिकारी उशीरा आले. त्या सर्वच कर्मचारी आधिकारी यांना आम्ही गुलाब पुष्प दिले.तर अनेक अधिकारी व कर्मचारी हे गेटवर उभे आहोत हे पाहून पळून गेले. अनेक कर्मचारी व अधिकारी हे कार्यालय मध्ये आलेच नाहीत. यावेळी माहिती देतांना आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड म्हणाले, उशिराने आलेल्या एका कर्मचार्‍याने तर आम्हा आंदोलकांना अरेरावीची भाषा वापरून धमकी देखील दिली.

त्याबाबत आम्ही उशिरा आलेल्या व अरेरावी करणार्‍या कर्मचार्‍यांवर प्रशासकीय कारवाई करावी यासाठी गटविकास अधिकारी यांचेकडे तक्रार केली आहे. त्यावेळी गटविकास अधिकारी यांनी देखील सविस्तर माहिती घेऊन उशिरा येणार्‍या कर्मचारी व अधिकारी यांना नोटीस पाठऊन खुलासा घेऊ असे आश्वासन दिले आहे. यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड,गोरक्ष ढाकणे, सोमनाथ बोरुडे, राजेंद्र दगडखैर, भास्कर दराडे उपस्थीत होते.

Related Stories

No stories found.