
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
पाथर्डी पंचायत समिती मधील अनेक कर्मचारी अधिकारी हे कार्यालयात वेळेवर उपस्थित नसतात याची माहिती घेण्यासाठी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड व पदाधिकार्यांनी बुधवारी (दि.3) सकाळी अकरा वाजल्यानंतर कार्यालयात जाऊन विविध विभागांची झाडझडती घेतली.
यामध्ये तीन कर्मचारी हजर नव्हते हजेरी पटावर त्यांच्या कोणत्याही साह्यां नव्हत्या. तर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाणीपुरवठा विभागाचे अभियंता त्या ठिकाणी उपस्थित नसल्याने अधिकारी व कर्मचार्यांवर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी किसन आव्हाड यांनी केली. बुधवारी आम आदमी पार्टीचे किसन आव्हाड, शुभम गांधी, भास्कर दराडे, गोरक्ष ढाकणे, रामकिसन शिरसाट, कृष्णा पांचाळ या कार्यकर्त्यांनी पंचायत समितीच्या कार्यालयात जाऊन सामान्य प्रशासन, बांधकाम, पाणीपुरवठा, आस्थापना अशा विविध विभागात भेट देऊन पाहणी केली. अनेक कर्मचारी हे वेळेवर येत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आलेल्या लोकांची काम वेळेवर होत नाही. अधिकारी कर्मचारी वेगळच काहीतरी कारण सांगून आपले खाजगी कामे करतात आणि कार्यालयात उपस्थित राहत नाही. अशा अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
आपने गट विकास अधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पाथर्डी पंचायत समिती कार्यालय मध्ये सर्वच विभागामध्ये अनेक महत्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचारी है कार्यालयीन वेळेमध्ये कार्यालयामध्ये उपस्थित नसतात. अभियंते, विस्तार अधिकारी काही गैरहजर असलेले कर्मचारी है साइटवर गेलेले आहेत तर काही कर्मचारी शासकी कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत. असे ठराविक उत्तर शासकीय भाषेत दिले जाते. मुख्यालय सोडताना कार्यालयामध्ये असणारे हालचाल रजिस्टर मध्ये नोंद असावी, त्याचप्रमाणे हजेरी पत्रकावरती नियमित सह्या करणे देखील बंधनकारक आहे. कुठेही हालचाल रजिस्टर मध्ये नोंद केलेली नाही, त्याचप्रमाणे हजेरी पत्रकामध्ये देखील अनियमितता केल्याचे आढळून आले नाही.यामुळे सर्वसामान्य नागरिक कार्यालयामध्ये आल्यानंतर त्यांचे काम होत नाही. अशा कामचुकार व दप्तर दिरंगाई करणार्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
जे कर्मचारी कार्यालयात आले नाहीत अशा काहीचे रजेचा अर्ज कार्यालयात प्राप्त झाला आहेत. तर काही कर्मचारी व अधिकारी शासकिय कामानिमित्त बाहेर गेले आहे.
डॉ. जगदीश पालवे, गट विकास अधिकारी