पाथर्डी नगरपालिका पाण्याच्या टाकिचे काम निकृष्ठ

नगरसेविका बंग यांनी काम पाडले बंद
पाथर्डी नगरपालिका पाण्याच्या टाकिचे काम निकृष्ठ

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी नगरपालिकेच्या वतीने वैशीष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत शहराला पाणी पुरवठा करणासाठी रामगिरबाबा टेकडीवर बांधण्यात येणार्‍या पाण्याचे टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत नगरसेविका दिपाली बंग, माजी नगरसेवक रामनाथ बंग यांनी हे काम बंद पाडले.थर्ड पार्टी ऑडिट होईपर्यंत काम बंद ठेवण्याचे आदेश मुख्याधिकार्‍यांनी दिला आहे.

शहरातील रामगीरबाबा टेकडीवर व वामनभाऊ नगरमध्ये पाण्याच्या टाक्यांचे भुमीपूजन मागील महीन्यात वाजत गाजत झाले. सुमारे पावणेदोन कोटींचे काम असून कामाच्या दर्जाबाबत सुरुवातीपासूनच लोकांचे लक्ष होते. नगरसेविका दिपाली बंग,माजी नगरसेवक रामनाथ बंग, नाना राऊत, शहनवाज पठाण, सचिन मुनोत, सचिन रत्नपारखी यासह परिसरातील नागरीकांनी अचानक जाऊन कामाची पाहणी केली. हे काम निकृष्ट असल्याचे निदर्शनास आल्यावर आंदोलकांनी मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी त्वरित धाव घेऊन लोकांना शांत केले. यावेळी ठेकेदाराच्या वतीने काम पाहणार्‍या कर्मचार्‍याला समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत.

जनता दरबारात लेखा परिक्षण

गेल्या पाच वर्षातील सर्वच विकासकामांचे जनतेच्या दरबारात लेखा परीक्षण करून प्रसंगी न्यायालयात दाद मागू.खुले नाट्यगृह,जॉगिंग पार्कच्या कामावर जेवढा खर्च झाला,तेवढ्या पैशात संपूर्ण शहराच्या विकास योजना पूर्ण झाल्या असत्या.असा इशारा बंग यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com