पाथर्डी नगरपालिकेची अतिक्रमण विरोधी मोहीम

जुनी मंडईसह चार ठिकाणी कारवाई
पाथर्डी नगरपालिकेची अतिक्रमण विरोधी मोहीम

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जुनी भाजी मंडई, वसंतराव नाईक पुतळ्याशेजारी, मुंडेनगरकडे जाणार्‍या रस्त्यावरील एक व शिवशक्तीनगर मधील एक अतिक्रमण जनीमदोस्त करण्यात आले. या अतिक्रमणाबाबत शहरातील नागरिकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या होत्या.

नगरपालिकेतील अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख गौरव आदिक, शुभम काळे, दत्तात्रय ढवळे,शिवाजी पवार व कुरेश पठाण यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी अतिक्रमणे हटविली. जुनीभाजी मंडई येथील सुरेश भागवत यांचे पत्र्याचे शेड,मुंडेनगरकडे जाणार्‍या रस्त्यावर शेळके यांची टपरी, शिवशक्तीनगरमधील एडके यांचे ओपनस्पेसमधील अतिक्रमण तसेच स्व.वसंतराव नाईक पुतळ्याजवळील शिंदे यांची टपरी इत्यादी चार अतिक्रमणे हटविण्यात आली.नागरिकांनी या चारही अतिक्रमणाबाबत लेखी तक्रारी केल्या होत्या. पालिकेने एकाच दिवशी हे चारही अतिक्रमणे काढून टाकली.यावेळी किरकोळ शाब्दीक चकमक वगळता शांतता होती.

धनदांडग्यांची अतिक्रमणेही काढा

शहरातील केलेले किरकोळ अतिक्रमणे काढली ठिक आहे. मात्र शहरातील धनदांडगे व विविध पक्षाचे पुढारी आणि कार्यकर्त्यांनी केलेली अतिक्रमणे काढायचे धाडस पालिकेच्या अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी दाखवावे, अशी मागणी नागरीकांनी केली आहे. गरीबांच्या झोपड्या मोडा मात्र ज्यांना राजाश्रय आहे त्यांची अतिक्रमणे काढायला कोण येणार,असा प्रश्न नागरिक विचारीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com