वाघाच्या पिंजर्‍याला माकडाची प्रतीक्षा

वाघाच्या पिंजर्‍याला माकडाची प्रतीक्षा

तिसगावात वनविभागाच्या पिंजर्‍याची चर्चा

करंजी |प्रतिनिधी| Karanji

पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील तिसगाव (Tisgav) येथे ऐन व्यापारी बाजारपेठेत वाघाला (Tiger) पकडण्यासाठी लावण्यात येणारा पिंजरा (Cage) चक्क माकड (Monkey) पकडण्यासाठी वनविभागाकडून (Forest Department) लावण्यात आला आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून या पिंजर्‍याच्या (Cage) जवळपासही माकड (Monkey) फिरकले नाही. मात्र हा पिंजरा नेमका लावलाय कोणासाठी याचीच आता खमंग चर्चा तिसगावमध्ये (tisgav) रंगली आहे.

मागील पंधरा दिवसांपूर्वी तिसगाव (Tisgav) येथे एक माकड (Monkey) दाखल झाले आहे. या माकडाने सवयी प्रमाणे आपले माकडचाळे दाखवत चार पाच लोकांना चालता-चालता चावा घेतला तर दुकानासमोर लावलेल्या काहींच्या मोटारसायकली पाडून दिल्या रस्त्याच्याकडेला बसलेल्या फेरीवाल्यांच्या वस्तूंचीही नासधूस केली. त्यानंतर काही ग्रामस्थांनी थेट वन विभागाला याबाबत तक्रार करून हे त्रासदायक माकड पकडण्याची विनंती केली.

त्यानंतर वन विभागाने उंडाळे क्लॉथ शेजारी वाघ पकडण्यासाठीचा पिंजरा लावला व त्या पिंजर्‍यात चार-पाच दिवस केळी,सफरचंद ठेवले परंतु म्हणतात ना माकडाची (Monkey) जातच लय हुशार पिंजरा लावल्यापासून आजतागायत हे माकड या परिसरात सुद्धा कुठे फिरकले नाही. त्यामुळे हा पिंजरा नेमकी लावलाय कुणासाठी तिसगाव परिसरात कुठे बिबट्या (Leopard) आला की काय ? याची देखील चर्चा हा पिंजरा पाहून सुरू झाली आहे.

पंधरा दिवसांपूर्वी तिसगावमध्ये आलेल्या वानराने काही नागरिकांना चावा घेतल्याची तक्रार आल्यानंतर या वानराला पकडण्यासाठी ज्या परिसरात हे माकड फिरत होते त्या ठिकाणी पिंजरा लावला होता. परंतु पिंजरा लावल्यानंतर त्या परिसरात व गावात कुठेच माकड आल्याचे व दिसल्याचे नागरिकांकडून बोलले जात नाही. त्यामुळे लवकरच हा पिंजरा कार्यालयात आणला जाईल.

- दादासाहेब वाघुळकर वनपरिक्षेत्र अधिकारी तिसगाव

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com