पाथर्डी बाजार समिती उपसभापतीच्या पतीवर बलात्काराचा गुन्हा

समितीचा भुखंड देण्याचे अमिष दाखवून प्रकार
पाथर्डी बाजार समिती उपसभापतीच्या पतीवर बलात्काराचा गुन्हा

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतींच्या पतीवर बाजार समितीचा भूखंड देण्याचे अमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार 18 व 22 ऑगस्टरोजी घडला असून याप्रकरणी आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र विलास गर्जे (रा. पांगोरी पिंपळगाव, ता. पाथर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव असून तो प्राथमिक शिक्षक आहे. तसेच तो पाथर्डी बाजार समितीच्या उपसभापती मंगल गर्जे यांचा पती आहे. या प्रकरणी कोल्हार येथील पिडीत महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पाथर्डी बाजार समितीची भुखंड वाटपाबाबत एका वृत्तपत्रातील जाहीरात वाचुन पिडीत महीलेने भुखंड मिळण्यासाठी बाजार समितीकडे अर्ज दाखल केला होता. अर्जावर दिलेल्या फोन नंबर वर पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीचा पती राजेंद्र विलास गर्जे यांने फोन केला. माझी पत्नी बाजार समितीची उपसभापती आहे. तुला भुखंड पाहीजे असेल तर मला भेट असे सांगितले.

महीला पाथर्डीत आली तेव्हा राजेंद्र गर्जे याने तिला 18 आँगस्ट 2021 रोजी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास शेवगाव रोडवरील अर्जुना लाँन्सजवळीत एका गाळ्यात उपसभापती बसलेल्या आहेत तेथे जाऊ व समक्ष बोलु असे सांगुन पिडीत महिलेला तेथे जाण्यास सांगीतले. प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपसभापती अगर इतर कोणीही नव्हते.त्यांनंतर राजेंद्र गर्जे याने गाळ्याचे शटर बंद करुन तेथे पिडीत महिलेला जीवे मारण्याची धमकी देत विविस्त्र करुन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर झालेल्या प्रकाराबाबत कोठे काही बोललीस तर तुला जिवे ठार मारीन अशी धमकी दिली.

त्यानंतर सदर महीला तिच्या घरी गेली.त्यानंतर पुन्हा राजेंद्र गर्जे 22 आँगस्ट 2021 रोजी सकाळी अकरा वाजता महीलेच्या घरी जाऊन तिच्या घरात तिच्यावर पुन्हा बलात्कार केला.महीलेने घडलेला प्रकार तिच्या पतीला सांगितला.पतीने व नातेवाईकांनी धीर दिल्यानंतर महीलेने आज पोलिसात तक्रार दिली आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात राजेंद्र गर्जे याच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 नुसार 376, 504, 506 या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.