दारू पिण्यासाठी घेतलेले पैसे परत न केल्याने एकाचा खून

दोघांवर गुन्हा दाखल
दारू पिण्यासाठी घेतलेले पैसे परत न केल्याने एकाचा खून

करंजी |वार्ताहर| Karanji

पाथर्डी तालुक्यातील आदर्शगाव लोहसर येथे दारू पिण्यासाठी उधारीने घेतलेले पैसे परत केले नाही, म्हणुन झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोघांजणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी, पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथील सुदाम विक्रम गिते (वय 37) याने दारू पिण्यासाठी उधारीने पैसे घेतले होते. मात्र, अनेक दिवसानंतरही सुदाम हा धारीने घेतलेले पैसे परत देत नसल्याने आरोपी दत्तात्रय भाऊसाहेब वांढेकर व किरण सखाराम वांढेकर दोघे (रा. लोहसर) या दोघांनी सुदाम यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीनंतर सुदाम गिते याचा मृत्यु झाला.

याबाबत मयत सुदाम गीते याचा भाऊ आदिनाथ विक्रम गिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी दत्तात्रय वांढेकर व किरण वांढेकर यांच्या विरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पाथर्डी तालुक्यात खळबळ उडाली असून दारूच्या नशेपायी तरुणाला जीव गमवावा लागला असल्याच्या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या गुन्ह्यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक देखील केली आहे. या घटनेचा पुढील तपास पाथर्डी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक परमेश्वर जावळे हे करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com