अखेर 'तो' बिबट्या जेरबंद

बिबट्याला माळशेज घाटात सोडले
अखेर 'तो' बिबट्या जेरबंद

करंजी | Pathardi

गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या पाथर्डी तालुक्यांतील जवखेडे खालसा येथील सरगड वस्तीवर रविवारी रात्री आठ जेरबंद झाला आहे.

गुरुवारी पहाटे दादासाहेब सरगड यांचे शेळीची शिकार झाल्याचे उघडकीस आले. ठसे तपासणी झाली. शनिवारी वनविभागाने भक्ष्यांसह पिंजरा लावला. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी सायंकाळी पिंजऱ्यातील (भक्ष्य) शेळीच्या आवाजाने उसातून निघालेला बिबट्या पिंजऱ्याचे बाहेरून तिला पंजे मारत होता. तशी शेळी ओरडत होती. बाहेरून नाईलाज झाल्याने बिबट्या पिंजऱ्याचे मुख्य दरवाज्यात घुसला. पायरीवर त्याचा पाय पडताच पुढील दरवाजा बंद झाला. दरवाजा पडल्याचा आवाज सरगड यांनी ऐकला. वस्तीवरील लोकांनी एकत्रित पिंजऱ्यात जवळ येऊन बिबट्या जेरबंद बंद झाल्याची खातरजमा करून लगेच वनविभागाला कळविण्यात आले.

काही वेळातच सहाय्यक उपवनसंरक्षक रमेश देवखीळे, तिसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुळकर, वनपाल व्ही एम गाढवे, वनरक्षक भाऊसाहेब पिसे, गणेश पाखरे, वनकर्मचारी कानिफ वांढेकर, के बी दहिफळे,गणेश पाखरे, सरपंच अमोल वाघ, अॅड वैभव आंधळे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी घटनास्थळी येऊन वनविभागाला बिबट्यासह पिंजरा नगरकडे रवाना करण्यास मदत केली.

सहा वर्षाचा नर जातीचा हा बिबट्या माळशेज घाटातील जंगल परिसरात सोडून देण्यात आला. गर्भगिरीतील सटवाई दरा, श्री क्षेत्र मढी येथे दोन बिबटे यापुर्वीच वनविभागाने जेरबंद केले. परंतु बागायती भागांतील हा बिबट्या अनेक दिवस हुलकावणी देत होता. तिसराही बिबट्या जेरबंद झाल्याने जवखेडेखालसा, जवखेडे दुमाला, कामत शिंगवे, आडगाव, रेणुकावाडी, हनुमान टाकळी, कोपरे हा परिसर भयमुक्त झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com