अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पाथर्डी तालुक्यातील मढी परिसरात वन विभागाने लावलेल्या पिंजर्यात बिबट्या आज गुरूवारी जेरबंद झाला. हा बिबट्या नगरमध्ये आणला जात असल्याचे सांगण्यात आले.

पाथर्डी तालुक्यात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून तो माणसांवर हल्ला करत आहे. घाटशिरस रस्त्यावर बिबट्याने खलील शेख यांच्या कुत्र्याचा फडशा पाडला होता. पिंजरा लावण्याची मागणी झाल्यानंतर वन विभागाने ठसे घेत तो बिबट्या असल्याचा अनुमान काढले.

त्यानंतर उर्जन मरकड यांच्या शेतात बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला. आज गुरूवारी सकाळी बिबट्या त्या पिंजर्यात जेरबंद झाला. पकडलेला बिबट्या हा नरजातीचा असल्याचे सांगण्यात आले.