वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आरोग्य अधिकार्‍याने घेतला गळफास

करंजी प्राथमिक उपकेंद्रात लसीकरण सुरू असतांना घडला प्रकार ||चिठ्ठीत तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांसह प्रशासनातील बड्या अधिकार्‍यांची नावे
वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आरोग्य अधिकार्‍याने घेतला गळफास

करंजी (वार्ताहर)

करंजी (Karanji) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात (primary health sub-center) कार्यरत असलेले समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. गणेश गोवर्धन शेळके (Health Officer Dr. Ganesh Govardhan Shelke) अंदाजे (वय 36) यांनी मंगळवार (दि.6) रोजी दुपारी 1 च्या दरम्यान उपकेंद्रातील पंख्याच्या हुकाला दोरी बांधून गळफास घेवून आत्महत्या (Suicide) केली. दरम्यान, डॉ. शेळके यांनी सुसाईट नोट (Suicide note) सापडली असून त्यात तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यासह प्रशासनातील बड्या अधिकार्‍यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या (Suicide) करत असल्याचे नमुद केले आहे.

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आरोग्य अधिकार्‍याने घेतला गळफास
भयंकर! लहान मुलाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून

मंगळवारी डॉ. शेळके ड्युटीवर आल्यानंतर काही वेळाने त्यांना तिसगावला (Tisgav) बोलावले आहे, असे सांगुन तिसगावला ते गेले. त्यानंतर काही वेळाने ते परत आले. त्यावेळी ते तणावाखाली असल्याचे उपस्थित असलेल्या आरोग्य सेविकांना जाणवले. सेविकांनी त्यांच्याशी संवाद केला व सर जास्त टेंशन घेऊ नका.नोकरीमध्ये असे सुरूच असते, असे बोलणेही झाले. त्यानंतर ते पेन व कागद घेऊन आले व टॅब जमा करा, मी राजीनामा (resignation) लिहीणार आहे, असे त्यांनी आरोग्य सेविकांना सांगितले. त्यानंतर ते उपकेंद्रातील दुसर्‍या रुममध्ये गेले व दरवाजा आतून बंद करून घेतला. काही वेळाने आरोग्य सेविकेने (health worker) जेवनासाठी डा. शेळके यांना बाहेरून आवाज दिला. परंतू आतून प्रतिसाद मिळत नसल्याने जोरात दरवाजा वाजवला. पण तरीही प्रतिसाद न मिळाल्याने फोन लावला, पण फोनही उचलला गेला नाही, म्हणून सर्व आरोग्य सेविकांनी खिडकी उघडण्याचा प्रयत्न करत आत डोकावले तर डॉ. शेळके पंख्याच्या हुकाला दोरी लावून लटकलेले दिसले. डॉक्टरांनी आत्महत्या केल्याचे लक्षात येताच स्थानिक कर्मचार्‍यांनी तात्काळ तिसगाव, पाथर्डी येथील वरिष्ठांना माहिती कळवली.

पोलिसांनाही या घटनेची माहिती दिली. यावेळी पाथर्डीचे पोलीस निरीक्षक कौशल्य वाघ (Pathardi PI Kaushalya Wagh) घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश करत नातेवाईकांच्या उपस्थितीत डॉ. शेळके यांचा मृतदेह खाली उतरविला व त्यांनी लिहून ठेवलेली सुसाईड ताब्यात घेतली. आत्महत्या करण्यापूर्वी डॉ. शेळके यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये माझ्या आत्महत्यास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे (Health Officer Dr. Bhagwan Darade) हे जबाबदार असून प्रशासकीय सेवेतील तहसीलदार, जिल्हाधिकारी हेही जबाबदार आहेत. अतिरिक्त कामाचा ताण, तसेच वेळत पगार नाही व पगार कपातीची धमकी यामुळे मी आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहुन ठेवल्याचे आढळून आले.

डॉ. गणेश शेळके (Dr. Ganesh Shelke) यांचे पार्थिव उच्चस्तरीय तपासणी आणि पोस्टमार्टमसाठी पाथर्डी (Pathardi) येथे नेण्यात आले. घटनेची माहिती कळताच गटविकास अधिकारी शीतल खींडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भागवान दराडे, डॉ. होडशीळ, सरपंच बाळासाहेब अकोलकर, उपसरपंच भाऊसाहेब क्षेत्रे, यांच्यासह हवालदार अरविंद चव्हाण, सतिश खोमने, भाउसाहेब तांबे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व डॉ. शेळके यांचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते. डॉ. शेळके यांच्या निधनामुळे करंजी (Karanji) गावासह परिसरातून हळद व्यक्त होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com