पाथर्डीच्या जेलमधील 6 कैदी करोना पॉझिटिव्ह
सार्वमत

पाथर्डीच्या जेलमधील 6 कैदी करोना पॉझिटिव्ह

Arvind Arkhade

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी शहरासह तालुक्यात काल दिवसभरात 14 जणांना करोनाची लागण झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. यापैकी पाथर्डी पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यांत जेलमध्ये असलेल्या 6 कैद्यांना करोनाची लागण झाली असल्याने पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. रोज पन्नाशी पार करणारा करोना प्रसाराचा आकडा काल मात्र घसरलेला आढळून आला.

पोलीस ठाण्यातील 6 पॉझिटिव्ह आरोपी सोडले तर शहरात गुरुवारी दिवसभरात एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे शहरवासियांना थोडासा दिलासा मिळाला आहे. तसेच काल दिवसभरात शहर व तालुक्यातील 55 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.शुक्रवारी (दि.14) दिवसभरात एकूण 93 जणांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली.

यापैकी माणिकदौंडी येथील 6, टाकळी मानूर 1, मालेवाडी 1 या भागातील 8 रुग्ण तर पोलीस ठाण्यातील 6 आरोपी असे एकूण 14 रुग्ण गुरुवारी दिवसभरात करोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. यापूर्वी पाथर्डी पोलीस ठाण्यातील काही पोलिसांना देखील करोनाची बाधा झाली होती. त्यात काल 6 आरोपी पॉझिटिव्ह निघाल्यामुळे पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणखी भयभीत झाले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com