
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रीक निवडणुकीत डांगेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली. उर्वरित चौदा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सरपंचपदासाठी 41 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 109 उमदेवारी अर्ज दाखल झाले होते. 67 उमेदवारांनी अर्ज माघार घेतले आहेत. ग्रामपंचायत सदस्यांसाठी 460 पैकी 200 उमेदवारांनी माघार घेतली. तर 253 उमेदवार निवडणूक रिगंणात आहेत.
बुधवारी उमेदवारी अर्ज माघारीचा अखेरचा दिवस असल्याने तहसील कार्यालयात गर्दी झाली होती. यावेळी अनेक रूसवे, फुगवे, मनधरणी तसेच माघारीचे नाट्य परिसरात रंगले होते. करंजी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी 8 अर्ज आले होते. 6 जणांनी माघार घेतली 2 जण निवडणूक रिंगणात आहेत. सदस्य पदासाठी 60 अर्ज आले होते. 33 जणांनी माघार घेतली. 27 जण निवडणूक रिगंणात आहेत.
पाडळी - सरपंच पदासाठी 14 अर्ज, 9 माघार, 5 जण निवडणूक रिंगणात आहेत. सदस्य पदासाठी 42 अर्ज आले होते. 18 जणांनी माघार घेतली. 24 जण निवडणूक रिगंणात आहेत. हत्राळ- सरपंच पदासाठी दोघेजण निवडणूक रिंगणात आहेत. तर सदस्य पदासाठी 14 जण रिंगणात आहेत. सैदापूर- सरपंच पदासाठी 2 जण निवडणूक रिंगणात आहेत. सदस्य पदासाठी 14 जण निवडणूक रिगंणात आहेत. रेणुकाईवाडी- सरपंच पदासाठी 3 जण निवडणूक रिंगणात आहेत. सदस्य पदासाठी 14 जण निवडणूक रिगंणात आहेत. साकेगाव - सरपंच पदासाठी 4 जण निवडणूक रिंगणात आहेत. सदस्य पदासाठी 45 अर्ज आले होते. 20 जणांनी माघार घेतली.25 जण निवडणूक रिंगणात आहेत.
डोंगरवाडी- सरपंच पदासाठी 2 जण निवडणूक रिंगणात आहेत. सदस्य पदासाठी 14 जण निवडणूक रिंगणात आहेत. डमाळवाडी- सरपंच पदासाठी 2 जण निवडणूक रिंगणात आहेत. सदस्य पदासाठी 14 जण निवडणूक रिगंणात आहेत. जवखेडे खालसा- सरपंच पदासाठी 16 अर्ज आले होते. पैकी 11 माघार घेतल्याने 5 जण निवडणूक रिंगणात आहेत. सदस्य पदासाठी 26 जण निवडणूक रिगंणात आहेत. ढवळेवाडी- सरपंच पदासाठी 3 जण निवडणूक रिंगणात आहेत. सदस्य पदासाठी 15 जण निवडणूक रिंगणात आहेत. दगडवाडी- सरपंच पदासाठी 3 जण निवडणूक रिंगणात आहेत. सदस्य पदासाठी14 जण निवडणूक रिंगणात आहेत. चिचोंडी- सरपंच पदासाठी 2 जण निवडणूक रिंगणात आहेत. सदस्य पदासाठी 18 जण निवडणूक रिंगणात आहेत. धारवाडी- सरपंच पदासाठी 2 जण निवडणूक रिंगणात आहेत. सदस्य पदासाठी 15 जण निवडणूक रिंगणात आहेत. लगितेवाडी- सरपंच पदासाठी 12 अर्ज, 8 माघार, 4 जण निवडणूक रिंगणात आहेत. सदस्य पदासाठी 28 अर्ज आले होते. 9 जणांनी माघार घेतली.19 जण निवडणूक रिगंणात आहेत.
डांगेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध
तालुक्यातील एकुण 15 ग्रामपंचायतींची निवडणुक सुरू आहे. परंतु आज अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी तालुक्यातील डांगेवाडी ग्रामस्थांनी सर्वानुमते विचार करत विरोधातील अर्ज माघारी घेतल्याने सरपंच पदासह सात सदस्यांचे प्रेत्येक एक अर्ज शिल्लक राहिल्याने हे सर्व बिनविरोध निवडुण आले आहेत.