पाथर्डी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

9 जण ताब्यात, पाच लाखाचा मुद्देमाल जप्त
पाथर्डी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील तिनखडी व करोडी या दोन ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्यावर पाथर्डी पोलिसांनी छापा टाकून सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत जुगार खेळणार्‍या नऊ जणांना ताब्यात घेतले आहे.

सुनिल नवनाथ शिररसाट (32, रा. पिंपळगाव टप्पा), विष्णु सुखदेव दहिफळे (40), बळीराम विष्णु दहिफळे (40, दोन्ही रा. महिंदा ता. आष्टी, जि.बीड), विष्णु भगवान चिंतामणी (47, रा. विजयनगर, पाथर्डी), सुनिल गोपीनाथ वारे (48, रा.करोडी ता. पाथर्डी), अशोक भगवान दहिफळे (35, रा. महिंदा ता. आष्टी, जि.बीड) तीनखडी येथे राहुल शेषराव खेडकर (रा.तिनखडी), योगेश आश्रवा बडे (रा. भिलवडे), सचिन पोपट खेडकर (रा. तिनखडी ता.पाथर्डी) अशी ताब्यात घेलेल्या जुगारींची नावे आहेत.

तिनखडी व करोडी या दोन गावात जुगार चालत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांना समजताच चव्हाण यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, पोलिस उपनिरीक्षक सचिन लिंमकर, पो. कॉ. भगवान सानप, देविदास तांदळे, ईश्वर बेरड, अतुल शेळके, प्रल्हाद पालवे, ईश्वर गर्जे, एकनाथ गर्कळ, संदिप कानडे यांनी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास छापा टाकुन 7 संशयित तसेच जुगाराच्या खेळात त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, मोटार सायकल, कुलर व इन्वर्टरर असा 4 लाख 32 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केला आहे. पुढील तपास पाथर्डी पोलीस करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com