पाथर्डी : आधी सुविधा द्या, मगच दुकान बंदचा निर्णय घ्या

प्रशासनाबरोबरच्या बैठकीत व्यापार्‍यांचा पवित्रा
पाथर्डी : आधी सुविधा द्या, मगच दुकान बंदचा निर्णय घ्या

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) - बाजारपेठेतील गर्दी आळा घालण्यासाठी आज पालिका सभागृहात नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली व्यापार्‍यांची बैठक घेण्यात आली. त्यात पालिकेने व्यापार्‍यांना सुविधा द्याव्यात, नंतर बाजार पेठेतील दुकान बंद बाबतची वेळ ठरवावी. व्यापार्‍यांच्या सूचनांची पालिका प्रशासन दखल घेत नाही. व्यापार्‍यांना यापुढे बैठकीसाठी बोलवू नका, असा पवित्रा व्यापारी बांधवांनी घेतला आहे.

यावेळी नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, मुख्यधिकारी धनंजय कोळेकर, नगरसेवक रमेश गोरे, बजरंग घोडके, महेश बोरुडे, नामदेव लबडे, नगरसेविका मंगल कोकाटे, विरोधी पक्ष नेते बंडू बोरुडे, अनिल बोरुडे, रमेश हंडाळ, बबन बुचकुल, संजय डोमकावळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी व्यापार्‍यांनी विविध अडचणी मांडल्या. पालिका प्रशासनाला व्यापार्‍यांच्या प्रश्‍नाबाबत गांभीर्य नसेल तर बैठका कशासाठी असे यावेळी व्यापारी म्हणाले. यावेळी विरोधी नगरसेवक बोरुडे यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस सुभाष चोरडीया, राजेंद्र शेवाळे, बाळासाहेब जिरेसाळ, भैय्या इजारे, दिलीप गटागट, योगेश रासने, जयंत फळे, राजेंद्र गुगळे, दरंदले, धीरज गुंदेचा, उमेश रासने, मनोज गांधी, रामकीसन पंडित, शेळके, गोटू मंत्री, सुनील पाखरे, भगवान शेळके व्यापारी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com