पाथर्डीत अतिक्रमण विरोधी मोहिमेचा मुहूर्त हुकला

पोलीस बळ न मिळाल्याने मोहीम स्थगित
पाथर्डीत अतिक्रमण विरोधी मोहिमेचा मुहूर्त हुकला

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी शहरातील शेवगाव रस्ता व अन्य तीन ठिकाणचे अतिक्रमण काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी पालिकेला दिल्यानंतर गुरूवारी (दि.9) अतिक्रमण काढण्याचा मुहूर्त ठरला होता. मात्र पुरेसा पोलीस बंदोबस्त वेळेवर उपलब्ध न झाल्याने अतिक्रमण हटाव मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे.

पालिका प्रशासनाने अतिक्रमणावर हातोडा टाकण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता पोलिसांचे संख्याबळ वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अतिक्रमण कारवाई पुढे ढकली असली तरी पुरेसा पोलीस बंदोबस्त पालिकेला मिळाल्यावर कोणत्याहीक्षणी ही अतिक्रणविरोधी कारवाई सुरू होऊ शकते.मात्र सध्या पावसाळा सुरू झाल्याने अतिक्रमण हटाव मोहीम पावसाळ्यानंतरच सुरू होईल, असा अंदाज बांधला जात आहे.त्यामुळे अतिक्रमणधारकांना पावसाळ्यामुळे सध्या तरी दिलासा मिळणार आहे.

पाथर्डी शहरात वाढत्या अतिक्रमणामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. अतिक्रमणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले आहेत.नगरपालिका हद्दीतील शेवगाव रोडच्या जवळ असलेली अतिक्रमणे त्वरित हटविण्यात यावीत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी पालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांना दिले असून या आदेशानंतर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने आराखडा तयार केला आहे. लवकरच पालिकेकडून अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत.

शासनाचा निर्णय पावसाळ्यात अतिक्रमण काढू नये त्यामुळे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पालिका प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.वाढत्या अतिक्रमणामुळे प्रशासनाची मोठी डोकेदुखी वाढली आहे.वाहतुकीला अतिक्रमणामुळे खीळ बसत आहे.पालिका प्रशासनाने शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्ता बाबत अहमदनगर येथे जिल्हा पोलीस कार्यालयात वाढीव पोलीस बळ मिळावे, यासाठी मागणी केली आहे.अहमदनगर जिल्हा पोलीस कार्यालयाकडून पाथर्डी पोलिसांना अतिक्रमण बंदोबस्ताबाबत नुकतेच पत्र मिळाले आहे.

यंत्रणा सुसज्ज

कारवाई मोठी असल्याने पालिका प्रशासनाने जेसीबी यंत्र, ट्रॅक्टर, टेम्पो या सामग्री बरोबरच पालिकेतील अधिकारी, महिला पुरुष कर्मचारी, पोलीस प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपलब्ध करून संयुक्तरित्या अतिक्रमणाची कारवाई पार पाडण्यासाठी पूर्ण नियोजन केले आहे. प्रांतधिकारी,तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण मोहीम राबवली जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com