पाथर्डीत वीज कार्यालयावर आंदोलन

पाथर्डीत वीज कार्यालयावर आंदोलन

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

गेल्या आठ दिवसांपासून शहरातील विजेच्या सुरू असलेल्या लपंडावच्या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड

व माजी नगरसेवक रामनाथ बंग यांच्या नेतृत्वाखालील वीज महामंडळाचे सहाय्यक अभियंता मयूर जाधव यांना घेराव घातला.

यावेळी शंकर राऊत, अण्णा हारेर, घरकुल संघटनेचे अध्यक्ष सलीम शेख, युवा नेते अभिजीत गुजर, प्रशांत रोडी, प्रा. सुरेश कुलथे, शाहनवाज शेख, सचिन शेटे, माऊली कोकाटे, सोमनाथ रोडे, प्रदीप गायकवाड, संदीप काकडे, योगेश कलंत्री आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड म्हणाले, गेल्या आठ दिवसांपासून शहरातील वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. कमी-अधिक प्रमाणात वीजपुरवठा होत असल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून लाखोचे नुकसान झाले आहे. वीजबिल भरूनही वीज महामंडळाकडून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे.

वीजपुरवठा कायम खंडित होत असल्याने रात्री शहरात चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. तुमच्या वरिष्ठ पातळीवर काही अडचणी असतील तर आम्हाला सांगा आमचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून अडचण सोडविण्याचा प्रयत्न करू, मात्र वेठीस धरू नका, वीजपुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा आव्हाड यांनी दिला.

यावेळी रामनाथ बंग म्हणाले, विद्युतपुरवठा गेला तर रात्री कर्मचारी फोन उचलत नाहीत. उचलला तर उद्धटपणे बोलतात. प्रत्येकाने टेम्परवारी वायरमनची नेमणूक केलेली आहे. असा वार्‍यावर व्यवहार असेल तर नागरिकांचे काय होणार. लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला.

वीज महामंडळाचे सहा. अभियंता मयूर जाधव म्हणाले, यापुढे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर सुरळीत करू, संबंधित विभागाचा वायरमन कामात कुचराई करत असल्यास कारवाई करू, ज्या परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला असेल त्या परिसरातील नागरिकांना त्याबद्दल व्हॉट्सअ‍ॅपमार्फत माहिती देऊ, असे आश्वासन यावेळी दिलेे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com