ऐन दिवाळीत दरोडा; मारहाणीत वृद्ध ठार, पत्नी गंभीर

ऐन दिवाळीत दरोडा; मारहाणीत वृद्ध ठार, पत्नी गंभीर

करंजी ( वार्ताहर )

पाथर्डी तालुक्यातील करंजी गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास भावले वस्तीवर दरोडा पडला असुन...

दरोडेखोरांच्या मारहाणीत गोपीनाथ लक्ष्मण भावले वय (वर्षे 80) यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी शांताबाई गोपीनाथ भावले वय (वर्षे 76) यादेखील या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत.

मयत गोपीनाथ भावले
मयत गोपीनाथ भावले

घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपाधीक्षक सौरभ अग्रवाल, उपअधीक्षक संदीप मिटके यांनी घटनास्थळी येऊन तपासाची चक्रे फिरवली. या घटनेत जखमी भावले या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दरोडेखोरांनी ओरबडून नेली.

तर मयत गोपीनाथ भावले यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण झाल्याने घरात रक्ताचा सडा पडला होता. आजूबाजूच्या लोकांनी मदतीला येऊ नये म्हणून त्यांच्या घरावर देखील दरोडेखोरांनी दगडफेक केली.

घटनेची माहिती समजताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते. एका गरीब कुटुंबातील व्यक्तीचा या दरोड्यामध्ये जीव गेल्याने करंजी सह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com