करोना
करोना
सार्वमत

पाथर्डीत दिवसभरात पुन्हा २० करोना बाधीत रुग्ण

Arvind Arkhade

पाथर्डी|तालुका प्रतिनिधी|Pathardi

पाथर्डी शहरात आज पुन्हा २० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून यात एका पालिका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. त्याच्या संपर्कात आल्याने कुटुंबातील दोन व्यक्तींना करोनाची लागण झाली आहे.

तर उर्वरित सतरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे जय भवानी चौक व मौलाना आझाद चौकातील आहेत. रॅपिड टेस्ट किटने जलद गतीने करोना चाचणी आरोग्य विभागाने पाथर्डीत केली आहे. काल गुरुवार दि. १६ रोजी शहरात २२ करोना रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे दोन दिवसात शहरातील करोना रूग्णांची संख्या ४२ झाली आहे. तर तालुक्यात दोन दिवसात ६२ रुग्ण संख्या झाली आहे. त्यामुळे पाथर्डीकरांची चिंता वाढली आहे.

पाथर्डीतील ९१ जणांचे रॅपिड टेस्ट करण्यात आली.त्यामध्ये २० रुग्ण करोनाबधित आढळून आले आहेत. या २० रुग्णांमध्ये बहुतांश रुग्ण हे पाथर्डीतील शहरातील असल्याची माहिती तालुक्याचा आकडा ८० च्या वर गेला आहे. तालुका प्रशासनाकडून पाथर्डी शहर सध्या २३ जुलैपर्यंत आवश्यक सेवा वगळता बंद करण्यात आले आहे. .

घाबरू नका! सतर्क रहा, नियम पाळा, काळजी घ्या !

करोना पार्श्वभूमीवर आमदार मोनिकाताई राजळे यांचे नागरिकांना आवाहन

पाथर्डी तालुक्यासह शहरात करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यातील नागरिकांना घाबरू नका, सतर्क रहा, प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळून स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले आहे.

आमदार राजळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, की गेल्या आठवड्यापासून पाथर्डी शहर व तालुक्यामध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. गुरुवारी एकाच दिवसात पाथर्डी शहरात 22 व तालुक्यात 20 असे एकूण 42 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने 17 जुलै ते 23 जुलैपर्यंत पाथर्डी शहर कंटेन्मेंट झोन घोषित केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिले आहेत.

करोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे आ. मोनिकाताई राजळे यांनी उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार नामदेव पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक रत्नपारखी व नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याशी चर्चा करून करोनाचे रुग्ण वाढू नयेत, करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आ. मोनिका राजळे यांनी तालुक्यातील नागरिकांनी गेल्या तीन महिन्यांत करोना संसर्ग टाळण्यासाठी खूप धैर्याने व खंबीरपणे प्रशासनाला साथ दिली आहे.

संयम पाळल्याबद्दल जनतेचे आभार मानले आहेत. मात्र सध्या पुन्हा करोना साथरोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. नागरिकांनी संयम पाळावा, सतर्क रहावे, घाबरू नये स्वतःची काळजी घ्यावी, लग्र समारंभ, धार्मिक कार्यक्रम, भाजी बाजार आदी ठिकाणी गर्दी करणे टाळावे. सुरक्षित अंतर ठेवून, मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करुन स्वत:च स्वत:ची काळजी घ्यावी व करोनाची साखळी तोडण्यास तालुका नगरपालिका, पोलीस, आरोग्य विभाग व प्रशासनास सहकार्य करावे. आपले जीवन अमूल्य आहे, त्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com