पाथर्डी
पाथर्डी
सार्वमत

पाथर्डी तालुक्यात एकाच दिवशी ४२ करोना बाधीत रुग्ण

Arvind Arkhade

पाथर्डी|तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यात आज दिवसभरात तब्बल ४२ करोना रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सकाळी दहा रुग्ण तर सायंकाळपर्यंत पुन्हा ३२ रुग्णांना करोनाची लागण झाली आहे.

यामध्ये आगासखांड ०२, कोल्हुबाई कोल्हार ११, तिसगाव ०३, त्रिभुवनवाडी ०४, खाटीक गल्ली पाथर्डी २२ अशा एकूण ४२ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

शहर आणि तालुक्यात करोनाचा संसर्गाचा फैलाव झाल्याने प्रशासनापुढे मोठे आवाहन निर्माण होऊन करोना संक्रमाची साखळी खंडित करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

पाथर्डी शहर २३ जुलैपर्यंत बंद;फक्त अत्यावश्यक सेवा चालू राहणार- तहसीलदार नामदेव पाटील

पाथर्डी शहरात निघालेल्या करोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी शहर दि.२३ जुलै २०२० रोजी पर्यंत कंटेंटमेन्ट झोन घोषीत करण्यात आले आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा चालू राहणार आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com