पाथर्डीत आज पुन्हा २२ करोना बाधित रुग्ण
सार्वमत

पाथर्डीत आज पुन्हा २२ करोना बाधित रुग्ण

तीन दिवसात ८५ रुग्ण

Arvind Arkhade

पाथर्डी|तालुका प्रतिनिधी|Pathardi

पाथर्डी तालुक्यात आज शनिवार रोजी शहरात पुन्हा २० नवीन करोना रुग्ण पॉझिटिव्ह तर वाळुंज १ व तिनखडी येथील १ असे एकूण तालुक्यात २२ करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे यांनी दिली.

तीन दिवसात तालुक्यात ८५ रुग्ण करोना विषाणूने बाधित झाले आहेत. यामध्ये पालिकेचे तीन कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. तर त्यांच्या कुटुंबियांना याचा संसर्ग झाला आहे. सध्या तालुक्यात अत्यंत वेगाने करोनाचा फैलाव होत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com