पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

शेतकर्यांच्या विरोधात काळा कायदा करणार्या केंद्र सरकारचा धिक्कार असो, मोदी सरकारने जुलमी कायदा रद्द करा अशा घोषणाबाजी देत

पाथर्डी तालुका काँग्रेसच्यावतीने शहरातील नाईक चौकात धरणे आंदोलन केले.केंद्र सरकारच्या या कायद्याला विरोध दर्शवत लाखो शेतकरी बांधव रस्तावर उतरून आंदोलन करत असून त्याला पाठिंबा म्हणून पाथर्डी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनेे तालुकाध्यक्ष नासिर शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

दिल्लीच्या सीमेवर शेतकर्यांनी उभारलेल्या ऐतिहासिक आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व तसेच शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करा करावेत या मागणीसाठी पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांच्या धरणे आंदोलन करत केंद्रा सरकारवर जोरदार टीका करून निशाणा साधला.

काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, अल्पसंख्यांक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष एम. एम. शेख, आ. सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका काँग्रेस अध्यक्ष शेख यांनी कार्यकर्त्यांसह हे आंदोलन केले.

यावेळी जिल्हा काँग्रेस सहसचिव जालिंदर काटे, जिल्हा काँग्रेस प्रतिनिधी नवाब शेख, तालुका उपाध्यक्ष रवींद्र पालवे, तालुका सरचिटणीस आजिनाथ देवढे, सुभाष कोलते, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष अकबर पटेल, युवक शहराध्यक्ष दत्ता पाठक, विद्यार्थी तालुकाध्यक्ष पवन गरड, दिगंबर सोलट, युसुफ खान, सरफराज चौधरी, सिकंदर शेख, गणेश दिनकर, गणेश दहिफळे, अनिल दिनकर, प्रमोद मोरे, दत्ता मोरे, दीपक मोरे, विक्रम दहिफळे आदी उपस्थित होते.

शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष अमोल पाठक यांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा आणि आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. यावेळी दत्ता पाठक पवन गरड, दिगंबर सोलट, आदिनाथ देवढे, नवाब भाई शेख, अकबर पटेल, अमोल पाठक यांची भाषणे झाली. प्रास्ताविक जालिंदर काटे यांनी केले. आभार सुभाष कोलते यांनी केले.