पाथर्डीत सोनसाखळी चोरटा गजाआड

पाथर्डीत सोनसाखळी चोरटा गजाआड

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

बसमध्ये चढताना सोनसाखळी चोरणार्‍या चोरालाही पाथर्डी पोलीसांनी सापळा लावून शिताफीने ताब्यात घेतले. अद्याप दोन चोरटे फरार आहेत.

बाळू नवनाथ मासाळकर (रा.नाथसागर, पाथर्डी) असे पकडण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी बाबुराव भोंजीबा नागरगोजे (रा. चिंचपूर इजदे ) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पाथर्डी एसटी स्थानकावरून ते 21 एप्रिलला चिंचपूर इजदे येथे एसटीने जात असताना. एसटीत चढत असतांना त्यांची सोन्यांची चैन चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलिस नाईक संदीप कानडे, ज्ञानेश्वर रसाळ, भगवान सानप, नारायण कुटे, कृष्णा बडे, आप्पा वैद्य या पोलीस पथकाला या गुन्ह्यातील संशयित बाळू मासाळकर हा पाथर्डी शहरातील श्री आनंद महाविद्यालय परिसरात असल्याची माहिती मिळाली त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक गेले असता मासाळकर तेथून पळाला. मात्र पोलिसांनी त्याचा पाठला करून त्याला ताब्यात घेऊन अटक केली. यातील संशयित सागर पवार (रा नाथनगर,पाथर्डी), सुनील दत्तू मासाळकर (रा माणिकदौंडी रोड,पाथर्डी) हे संशयित फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com