पाथर्डी बसस्थानकातून 14 तोळे दागिने लांबवले

पाथर्डी बसस्थानकातून 14 तोळे दागिने लांबवले

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

शहरातील नवीन बसस्थानकातून एसटीबस मध्ये चढताना एका महिलेच्या पर्स मधून चौदा तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना 29 ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी सोमवारी (ता.4) पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कांता रावसाहेब जावळे (रा. भोसरी, पुणे) यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कांता जावळे ह्या पुण्याहून पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी या गावी नातेवाईकांकडे 29 ऑगस्ट रोजी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास जाण्यासाठी पाथर्डीच्या नवीन बस स्टँड येथे आल्या. बसमध्ये चढत असताना त्यांच्या पर्समधील चौदा तोळे सोने अज्ञात चोरट्यांनी काढून घेतले.

तोंडोळी येथे नातेवाईकांच्या गावी गेल्यानंतर कांता जावळे यांनी त्यांची पर्स उघडून पाहिली असता, त्यांना त्यात त्यांचे सोन्याचे दागीने दिसून आले नाहीत. त्यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल आव्हाड करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com