
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
येथील नवीन बस स्थानकामधून पुण्याला जाण्यासाठी एक महिला एसटी बस मध्ये चढत असताना महिलेच्या पर्समधून सोन्याचा नेकलेस अज्ञात चोरट्याने चोरल्याची घटना रविवारी (दि.26) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथील महिला मिरा अरविंद घोडके यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार मीरा घोडके ह्या हल्ली पुणे येथे राहत असून त्यांचे मुळ गाव पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव हे आहे. त्या रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पाथर्डी येथुन पुणे येथे जाण्यासाठी नविन बस स्थानकावर आल्या होत्या.
घोडके यांनी त्यांच्या जवळ असलेला सोन्याचा नेकलेस गळ्यात न घालता पर्समध्ये ठेवले होता. पाथर्डी ते पुणे जाणार्या एसटी बसमध्ये सामान ठेवण्यासाठी मिरा घोडके ह्या चढत असतांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पर्समधील 50 हजार रूपये किंमतीचा सुमारे अकरा ग्रामचे सोन्याचे नॅकलेस चोरुन नेला.