
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
पाथर्डीत प्रथमच बैलगाडा शर्यतीचे आयोजन करून नवा इतिहास नोंदवला गेला. शिवजयंती व आमदार मोनिका राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी सभापती विष्णूपंत अकोलकर यांनी आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीला राज्यभरातील सुमारे सव्वा तीनशे बैलगाड्यांनी सहभाग नोंदवला. रंगतदार शर्यतीत अंतिम स्पर्धेत विजेतेपदावर दीपक वराट प्रथम तर बबन लंगे यांच्या बैलगाडीने द्वितीय, सुभाष गोरे तृतीय, खंडू सतरकर चतुर्थ त्यांच्या बैलगाडीने पारितोषिक पटकावले. त्यांना अनुक्रमे 51, 41, 31 आणि 21 हजारांची रोख स्वरूपात बक्षीसे देण्यात आली.
राज्याच्या कानाकोपर्यातून बैलगाडी शर्यतप्रेमी पाथर्डी शहरात दाखल झाले होते. पाथर्डी शहरात प्रथमच होणार्या बैलगाडा शर्यती करिता तालुक्यातील नागरिकांचा मनात उत्सुकता लागली होती. अत्यंत अटीतटीची लढत स्पर्धेच्या ठिकाणी पाहायला मिळाली. या स्पर्धेसाठी आमदार मोनिका राजळे यांनी आवर्जून उपस्थिती लावून सजवलेल्या बैलगाडीतून स्पर्धेच्या ठिकाणच्या खेळपट्टीवर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
स्पर्धेचे मुख्य आयोजक माजी आमदार राजीव राजळे मित्र मंडळाचे विष्णूपंत अकोलकर, माजी जि. प . सदस्य राहुल राजळे, माजी नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके,अमोल गर्जे, तुकाराम पावार, शुभम गाडे, राधाकिसन कर्डिले, नितीन एडके, चारुदत्त वाघ, जमीर आतार, बंडू पठाडे, सुनील ओव्हळ, सोमनाथ अकोलकर, गणेश सोनटक्के, भीमराव फुंदे, डॉ. रमेश हंडाळ, सुभाष ताठे आदींची प्रमुख उपस्थिती होती.