पाथर्डी शहरात आता नाकाबंदी

करोनाला रोखण्यासाठी कडक उपाय योजना
पाथर्डी शहरात आता नाकाबंदी

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तहसीलदारांच्या सूचनेनुसार शहराची नाकेबंदी करण्याची तयारी पालिका प्रशासनाने युद्धपातळीवर सुरू केली आहे. शहरातील प्रमुख मार्गासह जास्त वर्दळीच्या रस्त्यांवर बॅरीकेटिंग करण्यात आले असून करोनाचा फैलाव रोखण्यासाठी पालिका प्रशासन ताकदीनिशी रस्त्यावर उतरले आहे.

प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार शाम वाडकर, पालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी तातडीची संयुक्त बैठक घेवून शहरातील गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. प्रतिबंध असलेल्या व्यवसायिकांकडून नियम धाब्यावर बसवून व्यवसाय सुरू आहेत. बाजारात गर्दीचा पूर वाढत आहे. सर्वसामान्य नागरिक वाढत्या गर्दीमुळे त्रस्त होऊन वाढती रुग्ण संख्या रोखणे प्रशासनाची परीक्षा पाहणारे ठरत आहे. शहर व उपनगरांमध्ये स्वतंत्रपणे पथके तैनात करण्यात येऊन मोटरसायकलवर शहरभर फिरणारे पथक वेगळे असणार आहे. दंडात्मक कारवाई प्रसंगी गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी पालिका प्रशासनास दिल्याने कर्मचारी या मोहिमेसाठी वापरण्यात येणार आहेत.

बॅरिकेटिंग काढणे तोडणे याविरुद्ध गंभीर स्वरूपाची कारवाई केली जाणार आह. मुख्याधिकारी कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या विविध विभागातील प्रमुखांनी शनी मंदिर, कसबा पेठ, उर्दु शाळा परिसर, नाथनगर मुख्य रस्ता बॅरीगेटिंग केले आहेत. सकाळी 9 वाजल्यापासून सर्व पथके एकाच वेळी कार्यरत होतील. फळबाजार व भाजीबाजार एका ठिकाणी न बसवता अशा विक्रेत्यांना शहरभर फिरण्यास सकाळी अकरा वाजेपर्यंत परवानगी असेल. लवकरच अतिक्रमणे हटवून रस्ता वाहतुकीस योग्य केला जाईल. राष्ट्रीय महामार्गासह, नवी पेठ, चिंचपूर रोड, बाजारतळ, उपनगरांमधील मुख्य रस्त्यावरील अस्थायी अतिक्रमणे हटविली जाणार आहेत.

बॅरीगेटिंग मोहिमेमध्ये गौरव आदिक, महेश कवादे, लक्ष्मण हाडके, रशीद शेख, ज्ञानूसिंग परदेशी, जावेद शेख, बंडू फळे, सोमनाथ गर्जे आदी विभाग प्रमुख व कर्मचारी सहभागी झाले असून रस्त्यावर व ओट्यावर विनाकारण बसणार्‍या विरुद्ध मुंबई पोलीस अधिनियमान्वये कारवाई करण्याचा निर्णय पाथर्डी पोलिसांनी घेतल्याचे सांगण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com