
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
तालुक्याच्या पुर्व भागातील काही गावातील बचतगटातील महीलांना निर्धुरचुल (विनाधुराची चुल) मिळेल असे सांगुन ऑनलाईन अजर्र् भरुन घेण्यासाठी प्रत्येक महिलेकडुन दोनशे रुपये घेण्यात आले आहेत. ही लूट कोण करत आहे. याची चौकशी करून कारवाईची मागणी नागरीकांनी केली आहे.
महिला आर्थिक विकास मडंळाच्या वतीने एका खाजगी कंपनीच्या मदतीने निर्धुरचुल वाटप करण्याची माहीती दिली जाते. केवळ सर्वेक्षण चालु असताना शंभर ते दोनशे रुपये फाँर्म भरण्याचे पैसे स्थानिक महीलांनी जमा केले आहेत. येळी, खरवंडी कासार परीसरातील अनेक गावात बचत गटाच्या महीलांना या निर्धुरचुल देण्याचे सांगितले जात आहे. तुमचा फाँर्म आँनलाईन भरावयाचा आहे.
तीन हजार रुपये किंमतीची निर्धुरचुल मोफत मिळणार असल्याने त्यासाठी फाँर्म भरायला दोनशे रुपये मागितले जात आहेत. अनेक महिलांकडुन दोनशे रुपये घेतले गेले आहेत. काही गावात शंभर रुपये महीलेप्रमाणे पैसे जमा केले आहेत. फाँर्म भरणा-या महीलांची संख्या लक्षात घेता सुमारे चारशे ते पाचशे महीलांचे अर्ज भरुन घेण्यात आले आहेत. आणखी अनेक गावात महीलांना आर्थिक लुबाडणुक सुरु असल्याच्या तक्रारी महीलांनी केल्या आहेत. बचत गटातील महिलांची नावे उघड करु नका अन्यथा आम्हाला कर्ज व शासकिय योजना मिळणार नाहीत अशी धमकी संबंधिताकडुन दिली जाते. बचत गटाच्या महिलांची आर्थिक फसवणुक झालेली आहे.
महीलांना दोनशे रुपये परत करा अन्यथा अंदोलन करण्याचा इशारा खरवंडी कासार व येळी गावातील काही महीलांनी दिला आहे. आम्ही लेखी तक्रार देत अहोत. काही प्रकार बाहेर येतील. महीलांच्या अज्ञानाचा फायदा घेवुन त्यांची फसवणूक होत असल्याने अधिका-यांनी याची चौकशी करावी अशी मागणी महीलांनी केली आहे.