पाथर्डी शहरातील अतिक्रमणांकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

पाथर्डी शहरातील अतिक्रमणांकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

रस्त्यावर दुतर्फा पथारी मांडून व्यवसाय : जनजीवनावर मोठा परिणाम

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

महसूल (Revenue), पालिका व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष (police administration Ignore) व लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे शहरातील राष्ट्रीय महामार्गासह (National Highways) राज्य महामार्गावर (State Highways) दिवसागणिक अतिक्रमणे होत असून वाहतूक कोंडीमुळे जनजीवन ठप्प झाले आहे. महामार्गालाच आता आठवडे बाजारा सारखे स्वरूप आले असून शासन व जिल्हा प्रशासनाचा आदेश (District Administration Order) स्थानिक प्रशासनाकडून पायदळी तुडवला जात आहे.

करोना साथ आटोक्यात येत असताना लॉकडाउन (Lockdown) उठवत जिल्हा प्रशासनाने (District Administration) काही नियम व अटी लादून सर्व व्यवहार सुरळीत सुरू करण्यास परवानगी दिली. सर्व व्यापार्‍यांनी लगबगीने व्यवसाय सुरू केले. पालिका प्रशासनाने आठवडे बाजार बंद केल्याने बाजार तळ रिकामे पडून हातगाडी, फेरीवाले, फळविक्रेते, स्टेशनरी, कटलरी विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते अशा सर्वांनीच उपजिल्हा रुग्णालयापासून (Sub-District Hospital) जुन्या बस स्थानकापर्यंत व त्यापासून बाजार समितीपर्यंत जिल्हा बँकेपासून (District Bank) मध्यवर्ती बस स्थानकपर्यंत (Central bus station) रस्त्यावर दुतर्फा पथारी मांडून व्यवसाय सुरू केले.

मुख्य रस्त्यावर तर दुकान मालकाला दुकानात जाता येत नाही, अशी परिस्थिती बनल्याने अजंठा हॉटेलसमोर बेकायदेशीरपणे वाहनतळ झाले आहे. मुख्य बाजारपेठेमध्ये प्रवेश करायला वाहन चालकाला कसरत करावी लागते. प्रांताधिकारी तहसीलदार पोलिस निरीक्षकांना शहरातील वाहतूक कोंडी (Traffic jam), वाढती अतिक्रमणे (Encroachments) याचे देणेघेणे नाही. तहसीलदार (Tahsil) याकडे दुर्लक्ष (Ignore) करत आहेत. पोलिसांना (Police) कामात रस नाही. पालिकेचे मुख्याधिकारी (CEO) स्वतःची जबाबदारी विसरले असून पालिका अतिक्रमणविरोधी विभाग निव्वळ नावा पुरताच उरला आहे.

पालिकेतील विशिष्ठ कर्मचार्‍यांचे अतिक्रमण (Encroachments) धारकांशी मैत्रीपूर्ण संबंध असून लोकप्रतिनिधी, आमदारांना व्यापार्‍यांसह नागरिकांच्या अडचणीचे देणे घेणे उरले नाही. चार महिन्यांवर आलेल्या पालिका निवडणुकीची (Municipal elections) जुळवाजुळव करण्यात पालिका पदाधिकारी मग्न असून विरोधक सत्ताधार्‍याबरोबर लिव्ह इन गुड रिलेशनमध्ये असून सत्ताधार्‍यांना पुन्हा सत्तेची शाश्वती नसल्याने त्यांना सर्वसामान्य लोकांशी देणेघेणे राहिलेले नाही. चांगल्या कारभाराऐवजी कमिशनच्या टक्केवारीची सार्वत्रिक चर्चा शहरात होऊन सर्वसामान्य माणूस रस्त्यावर वावरतांना पुढारी व प्रशासनाच्या नावाने शिव्या शाप देत जीव मुठीत धरून वावरत आहेत.

व्यापार्‍यांना दंड ठोठावणार्‍या प्रशासनाची नजर विनामास्क फिरणार्‍या व सामाजिक अंतराचे पालन न करणार्‍या लोकांवर जात नाही. व्यापार्‍यांचे दुःख ऐकून घ्यायला लोकप्रतिनिधींनाही वेळ नाही. रस्त्यावर बाजारासाठी बसणार्‍या विक्रेत्यांना प्रतिबंध करून बाजारतळात जाण्याचा आदेश देण्यासही अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर येत नाहीत. पालिका जुन्या कार्यालयापासून पंचायत समिती कार्यालयाचा रस्ता चांगला झाला आहे. डांबरी रस्त्यावर पार्किंग करत ग्राहक सुद्धा मनसोक्तपणे खरेदीचा आनंद लुटत आहेत. करोनाची तिसरी लाट अंगणात आली असताना अधिकार्‍यांसह सर्व प्रशासनाची बेपर्वाई निरपराध लोकांच्या जीवावर बेतण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com