पाथर्डी : धूमश्‍चक्री प्रकरणी आरोपींना 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

दोन्ही गटातील पाच आरोपी जेरबंद
पाथर्डी : धूमश्‍चक्री प्रकरणी आरोपींना
 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) - दोन दिवसापुर्वी शहरात दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीतील दोन्ही गटातील पाच आरोपींना बुधवारी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना गुरुवारी पाथर्डीच्या न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश स्मिता वानखडे यांनी 30 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पाथर्डी शहराचा मुख्य चौक समजल्या जाणार्‍या अजंठा चौकात मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास शिरसाठवाडी व भिकनवाडा गटात लोखंडी रॉड,तलवारीने आपसातील तुंबळ हाणामार झाली. याघटनेत आठजण गंभीर जखमी होऊन 25 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

त्यापैकी प्रवीण शिवाजी शिरसाट (रा.शिसाटवाडी), मच्छिंद्र शिरसाट (रा. शिरसाटवाडी), मुन्ना निजाम शेख (रा. भिकनवाडा), रंगनाथ गायकवाड (रा.भिकनवाडा), छोटू राजू पठाण (रा.भिकनवाडा) पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना गुरुवार (दि. 27) पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 30 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. शिवाजी दराडे, आरोपींकडून अ‍ॅड. राणा खेडकर, अ‍ॅड सुरेश आंधळे यांच्यात युक्तिवाद झाला. दोन्ही बाजूच्या युक्तिवाद ऐकून न्यायाधीश यांनी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी पाच आरोपींना अटक केली असून या गुन्ह्यातील तीन आरोपींना गुरुवारी अटक केली आहे. या तीन आरोपींना आज रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. एकूण दोन्ही गटातील तेरा आरोपी अटकेत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com