पार्टनरशीपमधील दोन कोटी हडपले

भावासह पाच जणांविरुद्ध गुन्हा
पार्टनरशीपमधील दोन कोटी हडपले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भागीदारी संस्थेमध्ये असलेले भाग भांडवल (Share Capital) हडप करण्याच्या उद्देशाने रक्कम ऑनलाईन (Online) व चेकव्दारे (Cheque) वर्ग केल्याचे दर्शवून खोट्या नोंदी करून व्यावसायिकाची दोन कोटी पाच लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार समोर आला आहे. आनंद तुळशीराम रासकोंडा (वय 52 रा. वरवंडे गल्ली, माळीवाडा) असे फसवणूक (Fraud) झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

त्यांनी शुक्रवारी (दि. 22) कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा भाऊ दत्तात्रय तुळशीराम रासकोंडा, पुतणे श्रीनिवास दत्तात्रय रासकोंडा, विशाल दत्तात्रय रासकोंडा, विनायक दत्तात्रय रासकोंडा (सर्व रा. माळीवाडा) व सीए श्रीनिवास म्याना (रा. जुना बाजार, नगर) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. रासकोंडा कुटुंबाने सन 2016 मध्ये हॉटेल आदित्य प्राईड या नावाने भागीदारी संस्था स्थापन केली होती. सदर भागीदारी संस्थेमध्ये फिर्यादी आनंद रासकोंडा त्यांचा भाऊ दत्तात्रय व त्याची दोन मुले विनायक व श्रीनिवास असे चौघे भागीदार होते.

दरम्यान, फिर्यादी आनंद रासकोंडा हे भागीदार असलेल्या हॉटेल आदित्य प्राईड संस्थेमधील आर्थिक वर्ष 2020-21 मधील आनंद रासकोंडा यांच्या नावे जमा असलेल्या भाग भांडवलमधून दत्तात्रय, विनायक, श्रीनिवास, विशाल व सीए म्याना यांनी फिर्यादी आनंद यांची मागणी नसताना सुध्दा भागभांडवल हडप करण्याच्या उद्देशाने दोन कोटी पाच लाख रुपयांच्या रकमा ऑनलाईन पध्दतीने व चेकने वर्ग केल्याचे दर्शवून खोट्या नोंदी करून आनंद रासकोंडा यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी (Police) गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव करीत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com