भागीदाराची फसवणूक करणार्‍याचा जामीन फेटाळला

भागीदाराची फसवणूक करणार्‍याचा जामीन फेटाळला

17 लाखांची फसवणूक || कोतवालीत दाखल आहे गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

व्यवसायामध्ये भागीदाराची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात अतुल विठ्ठल चव्हाण याचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी फेटाळला आहे.

अतुल चव्हाण आणि संतोष दोमल यांनी भागीदारीमध्ये साईबाबा संस्थान येथील इमारतींना रंग देण्याचे काम घेतले होते. त्याबाबतचा दोघांमध्ये नोटरीसमोर करार झाला होता. या कामाच्या मोबदल्यात मिळणारी रक्कम दोघांनी 50 टक्के वाटून घेण्याचे ठरले होते. या कामासाठी संतोष दोमल यांनी अतुल चव्हाण याला 11 लाख रुपये चेकद्वारे तर सहा लाख रूपये रोख स्वरूपात असे एकूण 17 लाख रुपये दिले होते.

देवस्थानच्या भक्त निवासाचे रंगकाम केल्यानंतर 63 लाख 89 हजार 98 रुपयाचा धनादेश प्राप्त झाला. शैक्षणिक संकुलाचे रंगकाम केल्यानंतर 13 लाख 65 हजार 474 रुपये प्राप्त झाले. दोमल यांना एकूण 38 लाख 77 हजार 286 रुपये मिळणे अपेक्षित होते. चव्हाण याने एक लाख रुपये एन.एफ.टी.द्वारे दिले. या व्यवहारात 17 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. चव्हाणच्यावतीने याला जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. तो फेटाळण्यात आला आहे. दोमल यांच्यावतीने अ‍ॅड. फिरोज शेख यांनी काम पाहिले.

दरम्यान चव्हाण याने जागा खरेदी विक्री व्यवहारात फसवणूक केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दोन अर्ज दाखल झालेले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com