विवाह सोहळ्यांत 43 पॉझिटिव्ह

पारनेर महिला तहसीलदारांचा जिल्ह्यात पहिला प्रयोग यशस्वी
विवाह सोहळ्यांत 43 पॉझिटिव्ह
File Photo

सुपा |वार्ताहर| Supa

पारनेर (Parner) तालुक्यातील करोना संसर्गाची चिंता थेट मुख्यमंत्र्यांना (Anxiety about corona infection CM) असतांना तालुक्याच्या तहसीलदार (Tahsildar) यांनी रविवारी तालुक्यातील करोना साखळी तोडण्यासाठी लग्न समारंभ (Wedding ceremony) आणि त्या ठिकाणी होणार्‍या गर्दीवर (Crowd) लक्ष केंद्रीत केले. काल तालुक्यात 13 ठिकाणी लग्न समारंभ (Wedding ceremony), साखरपुडा (engagement) या ठिकाणी जमलेल्या 3 हजार 600 लोकांची करोना चाचणी (Covid 19 Testing) केल्यानंतर त्यात 43 करोना बाधित (Covid 19 Positive) आढळले आहे. अशा प्रकार सामुहिकपणे लग्न सोहळ्यात वर्‍हाडी मंडळींची करोना चाचणीचा पहिला प्रयोग जिल्ह्यात (first experiment of corona test in the district) तहसीलदार ज्योती देवरे (Tahsildar Jyoti Devre) यांनी यशस्वीपणे राबविला.

पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे (Tahsildar Jyoti Devre) यांच्या आदेशानुसार रविवारी पारनेर तालुक्यात महसूल विभाग (Parner Taluka Revenue Department ) व आरोग्य विभागाच्या (Department of Health) वतीने लग्न समारंभ, विवाह साखरपुडा कार्यक्रमाला हजर असलेल्याची सामुहिक करोना चाचणी (Covid 19 Testing) करून घेतली. तालुक्यात करोनाची दुसरी लाट (second wave of corona) कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. उलट दिवसंदिवस करोना बाधीतांचा आकडा वाढताना दिसत आहे. यामुळे तहसीलदार देवरे यांनी दोन दिवसापूर्वी तालुक्यातील 71 गावे संवेदनशील घोषित करून त्या ठिकाणी संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश (Lockdown Order) काढले. काल मोठी लग्नतिथी असल्याने मोठ्या संख्याने एकत्र येतील आणि एकमेंकांचा संपर्क वाढून संसर्ग वाढण्याची भीती होती.

यासाठी लग्न संयोजकांना महसूल विभागाने सक्त ताकीत देत विवाह सोहळ्याला 50 पेक्षा जास्त नागरिक दिसले तर कडक कारवाईचा इशारा दिला. तसेच तालुक्यातील प्रत्येक कार्यक्रम स्थळी मंगल कार्यालय या ठिकाणी करोना चाचणी कॅम्प लावण्याचे आदेश दिले. यासाठी त्या-त्या ठिकाणचे मंडल अधिकारी, तलाठी यांनी ग्रांमपचायत कर्मचारी व महसुल यंत्रनेला घेऊन व आरोग्य कर्मचारी यानी कार्यक्रम स्थळी प्रत्येक उपस्थितीची करोना चाचणी केली. त्यात 13 ठिकाणी 3 हजार 600 नागरिकांच्या चाचणी करण्यात आली. यात 43 बाधित आढळून आले.

सुपा येथेही औद्योगिक वसाहतीतील एका हॉलमध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम होता. तेथे तहसिलदाराच्या आदेशावरुन मंडल अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी बाळासाहेब कुसमुडे, डॉ. विद्या बारवकर, भाऊसाहेब साठे यांनी हॉलच्या दारात तपासणी कॅम्प लावून प्रत्येक उपस्थिताची तपासणी करुनच आत सोडले. यावेळी 31 नागरिकांचे नमुने घेण्यात आले व सुदैवाने यात ऐकही बाधित आढळून आला नाही. याच पद्धतीने तालुक्यात इतरही ठिकाणी विवाह तसेच इतर कार्यक्रमस्थळी करोना चाचण्या घेण्यात आल्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com